Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रसातारा कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

सातारा कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

सातारा : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश उच्च न्यायालय,मुंबई यांनी दिलेवरुन कौटुंबिक न्यायालय, सातारा येथे दि. २८ जानेवारी २०२५ रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर पाठकजी तसेच जिल्हा वकील बार संघाचे सदस्य हजर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री एल. बी. मगदूम होते. तसेच कौटुंबिक न्यायालयाचे विवाह
समुपदेशक डॉ. श्रीमती आर. एस. दाते व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात विधिज्ञ, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी ही हजर होते.
समुपदेशक, श्रीमती आर.एस. दाते यांनी सरकारी कामकाजामध्ये त्या त्या राज्यातील मातृभाषेचा वापर केला गेल्यास सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लवकर
मार्गी लागणेस मदत होईल तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्या
मागचे उद्दिष्ट त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितले.
प्रमुख पाहुणे पद्माकर पाठकजी यांनी मराठी भाषा ही दोन हजार वर्षा
पूर्वीपासून इतिहास असलेली ही मराठी भाषा ११० बोली भाषेत आहेत. मराठी
भाषा किती महत्वाची आहे या विषयी त्यांनी माहिती सांगितली. त्याप्रमाणे केंद्र
शासनाने देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आपण
मराठी वाचन केले पाहिजे त्याप्रमाणे आपले शिक्षण मराठी भाषेत झाले पाहिजे व
आपली संस्कृती जतन करणे, आपली भाषा समृध्द करणे तसेच न्यायालयीन
कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा असा त्यांनी उल्लेख
केला.
या कार्यक्रमात प्रमुख न्यायाधीश श्री. मगदूम यांनी मराठी भाषा
न्यायालयीन कामकाजात मोठया प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. मराठी भाषा ही
पक्षकारांसाठी उपयुक्त ठरणारी आहे असे स्पष्ट केले.

__________________________
फोटो- सातारा कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा पंधरवडा साजरा करताना न्यायाधीश मगदूम साहेब व मान्यवर

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments