Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रसातारा जिल्हा परिषदेच्या आवारातील स्वच्छता अभियानाने कचरा होणारा कालबाह्य ?

सातारा जिल्हा परिषदेच्या आवारातील स्वच्छता अभियानाने कचरा होणारा कालबाह्य ?

सातारा

(अजित जगताप ) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यास्तरावर मिनी मंत्रालय केले. त्याला जिल्हा परिषद असे नाव दिले. परंतु सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. या दुर्गंधीमुळे येणाऱ्या अभ्यागातांना व मान्यवरांना सातारा जिल्हा परिषद सुंदर माझी कार्यालय वाटत नव्हते. ते वाटावे. यासाठी आता सुंदर माझे कार्यालय अभियान शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा कचरा कालबाह्य होण्याची चिन्ह नक्की दिसतील ? असा आशावाद निर्माण झाला आहे.
सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती स्तरावर सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात सर्वात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अनेक विधायक उपक्रम राबवली आहेत. खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेमधील अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकारात्मक संदेश मिळाला आहे. त्याचाच भाग म्हणून सुंदर अभियान काळामध्ये दुपारी चार ते सहा या दोन तासाच्या कालावधीमध्ये व प्रत्येक शनिवारी कार्यालयाची आकर्षक रचना करावी व स्वच्छता राखावी. यासाठी चांगले धडे मिळाले आहेत.
वास्तविक पाहता आपल्या घरामध्ये स्वच्छता असल्यानंतर चांगले वातावरण राहते. शासकीय कार्यालय मध्ये सब घोडे बारा टक्के असेच वातावरण पाहण्यास मिळते. विद्युत वायरी निखळलेले आहेत. खिडक्यांवर धुरळा बसलेले आहे. अनेक वर्ष साफसफाई नसल्यामुळे फरशीवर धुळीचा थर साचला आहे. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती स्तरावर आता राजकीय विरोधकांनीच पोलखोल केले तर खऱ्या अर्थाने सुंदर माझे कार्यालय, सुंदर माझे विचार, सुंदर माझे वागणे. हे खरे ठरल असं मान्यता येत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या चार मजल्यावर फेरफटका मारला असता काही जिन्याच्या जागी पडलेले अनावश्यक साहित्य व अनेकदा आजूबाजूला निवांत पडलेला कचरा पाहून वेदना होत होत्या.ज्या सातारा जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये आपला ठसा उगवला ती हीच का सातारा जिल्हा परिषद ? असा सातारा जिल्हा परिषदेमध्ये येणारे काही अभ्यागत यांना वाटत होते. त्यांच्या सूचनांना आता चांगले बळ मिळाले आहे.
त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून सातारा जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाहिले जाईल असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे सातारा तालुका अध्यक्ष विजय ओव्हाळ व मदन खंकाळ व त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी ठामपण सांगितले..
………………………………..
फोटो – सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात दिसणारा कचरा आता नष्ट होणार… (छाया- अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments