Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रश्रीधर बुधाजी देवलकर आणि परिवार आयोजित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९९...

श्रीधर बुधाजी देवलकर आणि परिवार आयोजित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती संपन्न

प्रतिनिधी : संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी रोजी साजरी करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखांचे प्रेमी आणि विचाराने प्रेरित झालेले चाहते आहेत.शिवाय सर्व शिवसेना शाखा आणि विभागात साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. परंतु एकादा सामान्य शासकीय कर्मचारी बाळासाहेबांची जयंती साजरी करतात तेव्हा त्या जयंतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते.
कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली( पूर्व) येथील रुग्णालयातील प्रयोगशाळा आणि रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ आणि त्यांची पत्नी सौ. स्वाती श्रीधर देवलकर (परिचारिका) हा संपूर्ण परिवार महाराष्ट्र शासनाची सेवा सांभाळून सेवा निवृत्तीनंतरही स्वेच्छा रक्तदानाचे कार्य करणारे आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति प्रेम करणारे श्रीधर बुधाजी देवलकर आणि देवलकर या सेवाभावी संपूर्ण परिवाराने हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती साजरी केली.
सदर जयंती कांदिवली पश्चिम येथील समता क्रिडा भवन सभागृह येथे साजरी करुन स्वेच्छा रक्तदाते शिवसैनिक,परिचित स्थानिक शिवसेना शाखा,स्थानिक शिवसेना विभाग आणि हितचिंतक यांना आदर्श शिवनिष्ठ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या शुभ प्रसंगी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर
शिवसेना भवन अंतर्गत जेष्ठ शिवसैनिक कक्षाचे प्रमुख कार्यवाह चंद्रकांत खोपडे आणि सर्व पदाधिकारी,
विभाग प्रमुख अजित भंडारी,संतोष राणे,
शाखा प्रमुख प्रकाश शिंदे,प्रसाद पाटील,शिवसेना महिला संघटक सौ.शुभांगी शिंदे, सुवर्णा प्रसादे, या शुभ प्रसंगी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी श्रीधर देवलकर आणि त्यांच्या परिवाराचे तोंडभरून कौतुक करताना आपल्या मासिक वेतनातून असे पवित्र कार्य करणारा आमचा एक शिवसैनिक आपली महाराष्ट्र शासनाची शासकीय सेवा सांभाळून तीस वर्षात १२५ रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना महाराष्ट्र् शासन आणि महानगपालिका रक्तपेढी विभाग यांच्या सहकार्याने विनामूल्य रक्तकुपिंचा पुरवठा करीत आहे. याचा आम्हाला अभिमान असून ते करीत असलेल्या पवित्र कार्याची प्रशंसा केली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच शिवसेना भवन अंतर्गत ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे प्रमुख कार्यवाह श्री चंद्रकांत खोपडे यांनी देवलकर यांच्या कार्याचे कौतुक करताना असा शिवसैनिक होणे नाही असा संदेश देत श्री देवलकर हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. असे संबोधून त्यांच्या पवित्र कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच जेष्ठ शिवसैनिक कक्षाचे राजू सीधये,बाळ गुरव, दिलिप कामेरकर,सुरेश काळे यांनीही या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून धन्यवाद दिले. चंद्रकांत खोपडे यांच्या शुभ हस्ते सर्व स्वेच्छा रक्तदाते,शिवसैनिकांना आदर्श शिवनिष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पवित्र कार्यास सुनील जाधव,ललित सबनीस,
सत्यवान राणे,रमेश मोरे,शाखा संघटक रेखा कदम श्रीमती छाया डोयले,शाखाप्रमुख प्रसाद पाटील,
नरेंद्र काळे,अस्मिता मोहन, सौ.जयाक्षी,यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
या संपूर्ण पवित्र सोहळ्याचे चित्रीकरण करणारे
महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि पत्रकार,न्युज १
इंडिया,(नॅशनल चॅनेल)न्युज नेशन मॅक्स महाराष्ट्र रायगड जिल्हा प्रतिनिधी, दैनिक रायगड टाईम्स रायगडचे प्रमुख
श्री धर्मशील सावंत आणि व्हिडिओग्राफर निलम पवार यांनी कोणतेही शुल्क न घेता या पवित्र सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण करून विशेष सहकार्य केले. त्याच प्रमाणे पाली येथील समाज सेवक आणि मा. खासदार श्री राजन विचारे यांचे स्विय सहाय्य श्री चंद्रकांत चव्हाण आणि समाजसेवक पांडुरंग पिंपळे यांनीही या पवित्र कार्यास उपस्थित राहून धन्यवाद दिले.
श्री हनुमंत पवार यांनी सूत्र संचालन केले तर आदर्श शिवनिष्ठ सन्मान प्रदान करताना कवी श्रीधर देवलकर यांनी प्रत्येकाचे कार्य आपल्या काव्यपंक्तीने सादर करून शिवसैनिक आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली ही अदा प्रथमच शिवसेनेच्या सोहळ्यास सर्वांच्या नजरेत भरत होती तर या पवित्र सोहळ्यास सुमधुर संगीताची बरसात होऊन संगीतमय वातावरण पाहण्यास मिळाले.
आपण शिवसेना पक्षाचे काही देणे आहोत या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ही जयंती साजरी केली अशी भावना व्यक्त केली.
शेवटी श्री देवलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments