Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशएकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी...

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी…

मुंबई :  भाजपच्या वाटेवर असलेलले एकनाथ खडसे  यांना यांना जीवे मारण्याची धमकी  आली आहे.  एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता.धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही.   दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
  एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहे. वेगवेगळ्या नंबरवरुन खडसेंना धमकीचे फोन आले आहेत. विविध देशातून फोन येत असल्याची एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  आहे.धमकीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या दोन दिवस पासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं खडसे यांनी म्हटल आहे. विदेशातून हे कॉल येत असावे असा अंदाज खडसे यांनी व्यक्त केला असून पोलिस आता त्याचा तपास घेत आहेत.
विदेशातून धमकीचे फोन
भाजपशी  काडीमोड घेत तब्बल अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केलेले एकनाथ खडसे  लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.  कदाचित या पार्श्वभूमीवर धमकीचा फोन येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात पोलीसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिस तपास करत आहे.  

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments