Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रघावरी ग्राम सेवा संघ मुंबई व ग्रामस्थ मंडळ घावरी यांच्या संयुक्त विद्यमाने...

घावरी ग्राम सेवा संघ मुंबई व ग्रामस्थ मंडळ घावरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे आदर्श युवा पुरस्कार जाहीर

महाबळेश्वर : ग्रामदैवत भैरवनाथ,जोगेश्वरी झोळाई मातेचा यात्रा उत्सव २०२५ शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत असून दरवर्षी घावरी ग्राम सेवा संघ मुंबई व ग्रामस्थ मंडळ घावरी यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मानाचा आणि तितकाचं शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा स्तर उंचावणारा असा हा “आदर्श युवा पुरस्कार २०२५” यावर्षी तिघांना जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये श्री अनिल कृष्णा जाधव (एम.बी.ए. – फायनान्स), कु.सुरज बाळकृष्ण सकपाळ (एम.बी.ए.- सप्लाय चैन मॅनेजमेंट),आणि कु. यश राजेंद्र सकपाळ (बी.ई.मेकॅनिकल इंजिनिअर) यांना जाहीर झाला असून मान्यवरांच्या हस्ते तो वितरित करण्यात येणार आहे.

सदर पुरस्काराची संकल्पना सन २०२२ पासून ग्रामस्थांच्या नाविन्यपूर्ण विचाराने सुरू करण्यात आली. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. गावातील मुलं उच्चशिक्षित होऊ लागली,त्याचा परिणाम मुलांना चांगल्या हुद्द्यावर नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याने नकळतपणे “एक मुल शिकलं…,एक कुटुंब स्वावलंबी झालं…. हे चित्र गावामध्ये पाहायला मिळत असून आतापर्यंत अनेक मुलांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. या उपक्रमाची सोळशी भागामध्ये चांगल्या प्रकारे चर्चा सुरू असुन शिक्षण हाच केंद्रबिंदू हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून इतर मुलांमध्येही शिक्षणाची गोडी निर्माण होताना पाहायला मिळत आहे.
ग्रामस्थांचा हा “स्तुत्य” आणि “नाविन्यपूर्ण” पुरस्कारचा उपक्रम नावारूपाला आला असून संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात प्रसार व्हावा यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments