Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशराहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वाद अयोध्येतील संतांनी सुपूर्द केला...

राहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वाद अयोध्येतील संतांनी सुपूर्द केला अभिमंत्रित धनुष्यबाण

अयोध्या : रामनवमीच्या पूर्वसंध्येला महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना थेट आयोध्येतून प्रभू श्रीरामचंद्राचा खास आशीर्वाद मिळाला आहे. श्री राम मंदिराच्या गर्भगृहात अभिमंत्रित केलेला पवित्र धनुष्यबाण अयोध्येतील संतांच्या वतीने राहुल शेवाळे यांना सुपूर्द करण्यात आले. येथील तपस्वी छावनी पीठाधिश्वर जगद्गुरु परमहंस आचारी महाराजांच्या निमंत्रणावरून राहुल शेवाळे हे मंगळवारी सायंकाळी अयोध्येत दाखल झाले होते. प्रभू श्री रामाच्या दर्शनाच्या वेळी आगामी निवडणुकींच्या विजयासाठी आशीर्वाद देत
संतांनी हा धनुष्यबाण त्यांना सुपूर्द केला.

अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचारी महाराजांनी राहुल शेवाळे यांना रामनवमी निमित्त अयोध्येत दर्शनासाठी निमंत्रित केले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करून दक्षिण मध्य मुंबईतील सिध्दीविनायक, वडाळ्यातील राम मंदिर यांसारख्या प्रमुख मंदिरातील मोजक्या मान्यवरांसह राहुल शेवाळे अयोध्येत रवाना झाले. मंगवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान राहुल शेवाळे अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले. यावेळी श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी प्रार्थना केली. या प्रार्थने दरम्यान इथल्या संतांच्या वतीने राहुल शेवाळे यांना मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण देण्यात आला.

कोट
प्रभू श्रीरामाने दिला धनुष्यबाण

आयोध्येतील राम मंदिरांच्या गर्भगृहात अभिमंत्रित केलेला हा धनुष्यबाण म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वाद आहे. इथल्या संतांनी विजयी भव म्हणत दिलेला हा धनुष्यबाण आदरपूर्वक मुंबईत नेऊ. अयोध्येत भव्य प्रभू श्रीराम मंदिर व्हावे, ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे या धनुष्याबाणासह बुधवारी शिवाजी पार्क येथल्या स्मृती स्थळावर जाऊन वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार!

  • राहुल रमेश शेवाळे
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments