Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रशिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप !

शिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप !

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१२ तर्फे बोरिवली नॅशनल पार्क मधील आदिवासी नागरिकांना विभागप्रमुख श्री उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सचिन शिर्के, उपविधानसभा समन्वयक सौ सारिका झोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, शाखा संघटक सौ शुभदा सावंत, शाखा समन्वयक सौ माधुरी खानविलकर, युवासेना सचिन शिरसाट, वृषल पुसाळकर, आशिष सोंडकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत झोरे यांच्या सह उपशाखा संघटक सौ इतिश्री महाडिक, रईसा मुल्ला, सुलभा गावकर, सोनाली रोकडे यांनी यशस्वीपणे केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments