नवी मुंबई(भीमराव धुळप) : कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोपरखैरणे नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे व्या वर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे २५ वे वर्ष आहे.
नवी मुंबई मध्ये सातारा कराड विभागातील बहुसंख्य लोक राहत असल्याने कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी तर्फे श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. विभागातील लोकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावेळी एकूण ११० रक्तदात्यानी रक्तदान केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबईचे युवा नेते सागर नाईक, विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष आंनदराव कचरे, उपाध्यक्ष डी. आर. पाटील आणि सर्व संचालक व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.
अधिक माहितीसाठी
भीमराव हिंदुराव धुळप
संपादक/ पत्रकार महाराष्ट्र शासन
मो 9221117684/ 8779053059