प्रतिनिधी : धारावीतील सुप्रसिद्ध असलेले पंचशील गणेश मित्र मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील माघी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून १ फेब्रुवारी २०२५ रोजी गणेश जयंती निमित्त गणेश पूजन, अभिषेक, होम हवन, संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन २ फेब्रुवारी २०२५ रोजी खेळ महोत्सव यामध्ये रोख रक्कम आकर्षक बक्षिसे दिले जाणार ३ फेब्रुवारी २०२५ रोजी टाटा हॉस्पिटल येथील कॅन्सर रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम ४ फेब्रुवारी २०२५ रोजी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, होम मिनिस्टर आणि आकर्षक बक्षिसे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व आयोजित केलेल्या खेळ महोत्सवातील स्पर्धकांचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आदिवासी पाड्यातील मुलांना शालेय वस्तू अन्नधान्य किट वाटप असे सामाजिक उपक्रम पंचशील गणेश मित्र मंडळाने राबवले आहेत असे संस्थेचे संस्थापक महादेव शिंद,महादेव नारायणे, अध्यक्ष विकी हसनाळे, सचिव अविरत शिंदे व खजिनदार राजन पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
पंचशील गणेश मित्र मंडळ धारावी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
RELATED ARTICLES