Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रबृहन्मुंबई महानगरपालिकेचे ४ हजार शिक्षक कर्मचारी सातव्या वेतन व प्रवासी भत्याच्या च्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ४ हजार शिक्षक कर्मचारी सातव्या वेतन व प्रवासी भत्याच्या च्या प्रतीक्षेत .

प्रतिनिधी : केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाची घोषणा करून ती लागू करण्याचा तयारीत असताना मात्र बीएमसीचे ४००० कर्मचारी आजही सातव्या वेतन थकबाकी च्या प्रतीक्षेत आहेत. या बाबत मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचे अध्यक्ष के.पी. नाईक यांच्या कडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात खुलासा करत संबधीत विभागाचे उपशिक्षण अधिकारी विनोद कदम यांच्या कडे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे थकीत प्रवासी भत्ता तसेच प्रलंबित सातवे वेतन या बाबत पत्रव्यवहार देखील केला आहे. पण समाधान कारक उत्तर संबंधित विभागाकडून मिळत नसल्याची खंत या वेळी के.पी नाईक यांनी व्यक्त केली. मात्र पाठवपुरावा, प्रवासी भत्ता व सातवे थकीत वेतन मिळे पर्यन्त करणार असल्याचे माहिती त्यांनी या दरम्यान दिली.एकीकडे मुंबई महानगरपालिका आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका म्हणून नाव लौकिक मिळवते व प्रसिद्ध देखील आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणते हे कितपत योग्य आहे.
तर कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला कधी यश येते ? कधी बीएमसी प्रशासन जागृत होते व आपल्याच कर्मचाऱ्यांचा हक्क अधिकार त्यांना मिळवून देते का ? त्यामुळे या गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments