Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रनाट्यलेखक यशवंत माणके लिखित/दिग्दर्शीत "मुक्तांगण" या दोन अंकी नाटकाचा ६ वा प्रयोग...

नाट्यलेखक यशवंत माणके लिखित/दिग्दर्शीत “मुक्तांगण” या दोन अंकी नाटकाचा ६ वा प्रयोग दादरच्या छ.शिवाजी महाराज नाट्यगृहात…

मुंबई – ( दिपक कारकर ) : गेली अनेक वर्षे नाट्यक्षेत्रात आपलं आयुष्य वेचत नाट्यरसिक व रंगभूमीची सेवा करणारे गुहागर तालुक्यातील भूमिपुत्र सुप्रसिद्ध नाटककार/नाट्य कलावंत यशवंत माणके लिखित/दिग्दर्शीत असणारा एक नवा विषय रंगभूमीवर आणला आहे.रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. वृद्धाश्रम वर आधारित “मुक्तांगण” ह्या दोन अंकी नाटकाचा सहावा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराज मंदिर,दादर ( प. ) येथे होणार आहे.रसिक मायबाप प्रेक्षकांना नाटक नव्हे तर दुबळ्या आई बापाची व्यथा पहायला या असे प्रतिपादन नाट्य लेखक यशवंत माणके केले आहे.तीन पिढ्या एकत्रित बसून पुन्हा पुन्हा बघावे असे एकमेव नाटक “मुक्तांगण” मुंबईकरांसाठी ही सुवर्णसंधी आहे, वृद्धाश्रमातील बोलक्या व्यथा प्रत्यक्ष पहा.अशी नाट्यकलाकृती पाहण्यासाठी मोठया संख्येने या व कलाकारांना प्रोत्साहित करा व अधिक माहितीसाठी / तिकीटसाठी – ९८१९८७५६४८,९८९२४०८८५४ सदर भ्रमणध्वनी वरती संपर्क करावा असे संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments