Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले - रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले – रामदास आठवले

प्रतिनिधी :  अफवा पसरवून समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे काँग्रेसचे दिवस गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. त्यांनी देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे.परंतु देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही.संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.उलट नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे,उपाध्यक्ष महेश पवार यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

संविधान बदलण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे, या विरोधकांच्या आरोपावर आठवले म्हणाले की,काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून निवडणूकीत मते मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या पसरविल्या जात आहेत.मात्र अफवा पसरवून समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे काँग्रेसचे दिवस गेले आहेत.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. त्यांनीच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे, येत्या दिड वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होईल.बाबासाहेबांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याचे सरकार प्रयत्न करत असताना विरोधकांकडून राजकीय हेतूने मोदी सरकारवर खोटे आरोप केले जात असल्याचे आठवले यांनी सांगितले.देशात पुन्हा सत्ता मिळवत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.

२०१२ साली बांद्रा येथे रहायला गेलो तेंव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांचा शेजारी या नात्याने भेटायला गेलो होतो. तेंव्हा बाळासाहेबांनी आपल्याशी चर्चा करत शिवशक्ती -भीमशक्ती एकत्र येण्याची साध घातली.तेंव्हा विचारधारा वेगळी असली तरी काही किमानसमान कार्यक्रमाचे मुद्दे ठरवून आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेना-भाजप युती सोबत जाण्याचा निर्णय घेतला असे सांगताना रिपाई जेव्हा शिवसेना-भाजप युती सोबत आली तेंव्हा पासून युतीची महायुती झाली असेही आठवले यांनी सांगितले.जागावाटपात आरपीआयला एकही जागा मिळाली नसल्याने आरपीआय पिछाडीवर गेली आणि मागून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपात पुढे गेला.परंतु मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही चार पाऊले मागे घेत राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.मंडल आयोगाच्या शिफारशी प्रमाणे मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी सर्व प्रथम आरपीआयने केली होती असा दावा करतानाच, तामिळनाडूच्या धर्तीवर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसी वर्गाचे सध्याचे २७ टक्के आरक्षण कायम ठेवून दुसरा ओबीसी प्रवर्ग तयार करून त्यात मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असेही आठवले म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments