Saturday, June 21, 2025
घरमहाराष्ट्रसमर्थ प्रतिष्ठानचा 7 वा वर्धापन दिन संपन्न

समर्थ प्रतिष्ठानचा 7 वा वर्धापन दिन संपन्न

भाईंदर (प्रतिनिधी ):समर्थ प्रतिष्ठान या भाइन्दर मधील सुप्रसिद्ध सेवाभावी संस्थेचा 7 वा वर्धापन दिन नुकताच समर्थ प्रतिष्ठान कार्यालय ,नवघर पोलीस स्टेशन समोर ,नवघर नाका ,भाइन्दर पूर्व ,ठाणे येथे संपन्न झाला .समर्थ प्रतिष्ठान ही संस्था गेली सात वर्षे सामाजिक ,कला ,क्रीडा ,आरोग्य ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आली आहे .सालाबाद प्रमाणे याही वर्षी संस्थेचा 7 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला गेला .या प्रसंगी दुपारी 1ते 3 श्री सत्यनारायण महापूजा ,संध्या .6 नंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम ,6.30 ते 7महिलांचं मधुर सांगीत ,सायं 7 नन्तर सत्यनारायण पूजेसाठी येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत व रात्रौ 10 ते 11 समर्थ प्रतिष्ठान परिवार चं मधुर सांगीत आदी कार्यक्रम आयोजित केले होते . सदर सोहळ्यास समर्थ परिवार सदस्यांसह विविध पक्षांचे नेते ,पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments