Saturday, August 30, 2025
घरमहाराष्ट्रसातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवड; अध्यक्षपदी अजय कदम तर उपाध्यक्षपदी विजय...

सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवड; अध्यक्षपदी अजय कदम तर उपाध्यक्षपदी विजय जाधव

सातारा(प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील पत्रकारांनी जिल्ह्याच्या आदर्श पत्रकारितेचा वारसा सक्षमपणे पुढे चालवावा. सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. सामाजिक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम योगदान द्यावे,” असे अपेक्षा महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी व्यक्त केली.

सातारा जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत सातारा तालुका पत्रकार संघाची शनिवार दि.२५ जानेवारी रोजी बैठक खेळीमेळीत पार पडली. यात विविध विषयांवरील चर्चा, ठराव पारित करून सन २०२५-२६ या वर्षासाठी नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष हरिष पाटणे, पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका अध्यक्ष अजय कदम (पुढारी), उपाध्यक्ष विजय जाधव (तरुण भारत), सुनील साबळे (सातारा न्यूज), खजिनदार वसंत साबळे (पुण्यनगरी), सचिव पदी राहूल ताटे पाटील (झुंजार वीर) , सहसचिव गुलाब पठाण ( सकाळ), खजिनदार वसंत साबळे (पुण्यनगरी), कार्याध्यक्षपदी बाळू मोरे (पुढारी), संघटक पदी नितीन साळुंखे (मुक्तागिरी) तर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रमिला साबळे ( महाराष्ट्र न्यूज), सतिश जाधव ( अजिंक्य न्यूज), संतोष यादव (प्रभात), विकास जाधव (सकाळ) , निलेश रसाळ ( प्रभात), मिलिंद लोहार( ऐक्य), प्रविण राऊत (पुढारी) आदींची एकमताने निवड झाली.
यावेळी बोलताना विनोद कुलकर्णी यांनी, “पत्रकारांना कर्तृत्वाने सामाजिक प्रतिष्ठा मिळते. सामाजिक व्यवस्था अधिक निकोप होण्यासाठी नेहमीच व्यस्त रहा. यातून उल्लेखनीय वार्तांकन करत तालुका पत्रकार संघाचा आदर्श निर्माण करावा,”अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सातारा तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार संघाचे सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments