
प्रतिनिधी : रुणवाल ग्रीन्स नाहूर पश्चिम या ८ उत्तुंग टॉवर आणि १५३८ घर असलेल्या उच्चभ्रू संकुलात अनेक मान्यवर राहतात. या वर्षी ग्रीन्स ॲपेक्स को-ऑप हौ. असोसिएशन लि. (नि.), यांच्या तर्फे भारतीय राज्यघटनेचे जनक, भारतरत्न, विश्वभूषण, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव येथील सर्व जाती धर्मातील रहिवाश्यांनी एकत्र येऊन फार मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थिती आणि सहभाग घेवून संकुलातील मध्यवर्ती मोठ्या मैदानात साजरा केला. प्राध्यापक डॉ. उमाजी माधवराव मस्के – पीएच.डी. मुंबई युनिव्हर्सिटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२२ चे मानकरी, प्राचार्य, संचालक, पीएच.डी. रीसर्च सेंटर, सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई यां सारखे विद्वान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. सकाळी बुध्द वंदना आणि विपश्यना साधना करून या दिवसाची सुरुवात झाली.या संकुलात अनेक प्रांत, जाती धर्म, पंथाचे लोक सर्व उत्सव हे मोठ्या आनंदात उत्साहात साजरे करतात. राष्ट्रीय एकात्मता कशी असावी याचं हे संकुल एक सर्वोत्तम उदाहरण आहे. केदारे बंधूंनी सादर केलेली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवत गेली. उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश गुप्ते वयाच्या ७६ व्या वर्षी देखील तितक्याच ताकदीने हा कार्यक्रम राबवतात. या वेळी संकुलातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आर सेलिब्रेशन बँक्वेट हॉलमध्ये तब्बल ८00 माणसांनी प्रीती भोजन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय सोनवणे, चंद्रशेखर कांबळे, श्रीमती अश्विनी गवळी-अभ्यंकर,मंगेश मोरे, नितीन उतेकर, प्रणील नायर, डॉ श्रेयस धरपवार, पराग अहिरे, श्रीमती नॅन्सी डीसोझा,श्रीमती निर्मला रवी,श्रीमाती प्रतिभा घाडगे, दिपक रामटेके, दिनेश मुलचंदानी, प्रमोद हरगुडे, कैलास पाटील, अजय पिल्ले, संतोष गवाणकर, आणि समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी सर्व रहिवाश्यांना एकत्र आणण्यात पुढाकार घेऊन संकुलातील सर्व बंधू भगिनींना जोडून ठेवले आहे.
हा संकुल भारताच्या एकात्मतेचे उत्तम प्रतीक आहे.