Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्ररामायण रसामृत मराठी अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन

रामायण रसामृत मराठी अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन

नवी मुंबई प्रतिनिधी :- जावली – महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावच्या ह.भ.प . धोंडीराम महाराज संकपाळ यांनी मराठीमध्ये अनुवादीत केलेल्या ” रामायण रसामृत ” या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. माजी जलसंपदा मंत्री तथा माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व माजी खासदार संजीव नाईक ,ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांच्या उपस्थितीत कोपर खैरणे से. ५ ते ८ च्या कै.आ. अण्णासाहेब पाटील मैदानात सुरु असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी करण्यात आले. सदर प्रसंगी माथाडी युनियनचे नेते गुलाबराव जगताप व चंद्रकांतशेठ पाटील तसेच नगरसेवक संदीप म्हात्रे, शंकर मोरे , सुरेश सकपाळ ,भालचंद्र मढवी, प्र. समिती सदस्य मारूती सकपाळ , राही उद्योग समुहचे वसंतशेठ शिंदे, नितीन हिंगे, उद्योजक के.के. शेलार, शिक्षक बँकेचे संचालक संजय सकपाळ,ह.भ.प. आनंद महाराज कोंढाळकर, विजय महाराज शेलार , बाळकृष्ण शिंदे बुवा ,पांडुरंग बुवा जाधव सौंदरी, के.एन.मोरे बुवा ,नामदेव बुवा जाधव, आनंदराव सकपाळ साहेब, तामाणे बुवा बबन बुवा ,संपत बुवा, अशोक बुवा लाखवड, वाकीचे सरपंच हरीभाऊ कदम, तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम, राजेंद्र मोरे, अर्जुन चव्हाण, अशोक शिंदे,संजय जाधव, शांताराम कदम, इत्यादींच्या सोबत इतरही बहुसंख्य ग्रामीण व शहरी जावलीकर – महाबळेश्वरकर तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे पदाधिकारी व रहिवाशी उपस्थित होते .
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील शेतकरी एवढे मोठे धाडस करू शकतो ही उल्लेखनीय बाब असल्याचे सांगून

आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्याचे कौतुक करून रामायण रसामृत ग्रंथाला व लेखकांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या .
बबनराव संकपाळ यांनी आभार मानले .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments