Saturday, August 30, 2025
घरमहाराष्ट्रआसगावच्या माझी वसुंधरा अभियान, ग्रामस्थांच्या एकीने ठरले स्वाभिमान....

आसगावच्या माझी वसुंधरा अभियान, ग्रामस्थांच्या एकीने ठरले स्वाभिमान….

आसगाव(अजित जगताप) : माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सहभाग घेऊन सातारा तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या एकीने स्वाभिमान दाखवून दिलेला आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आसगाव येथील सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन होत आहे.

शोषखड्डा / परसबाग / पाझरखडा, घनकचरा व्यवस्थापन करीता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंडी या बाबीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आसगावचे सरपंच सुनंदा रामदास शिंदे उपसरपंच हिरालाल शिंदे, बाजीराव शिंदे, रेश्मा शिंदे, आशा शिंदे ,लता शिंदे, प्रभा कांबळे यांच्या समवेत ग्रामविकास अधिकारी अनुजा भगत व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोक चळवळ उभी उभी राहिल्याने ग्रामस्थांचा उत्साह वाढलेला आहे. घरातील स्वच्छते सोबतच स्वच्छ माझे अंगण आस गावची शोभा वाढवत आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन
कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता केली आहे. शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत
स्वरुपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुंबांचा पुढाकार घेत आहेत. त्याबाबतही मार्गदर्शन होत आहे.
सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्, सातारचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व आसगाव मध्ये माझी वसुंधरा अभियान यशस्वी ठरले आहे. कुटुंबस्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंड्यामध्ये वर्गीकरण करणे.वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखडा अथवा घरगुती खतखट्टा निर्मिती करून कच-याचे, घर किवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करण्यात आली आहे
सदर अभियान राबविणेकरीता अभियानाची माहिती व सूचना आसगावात दवंडी देऊन केली आहे. ग्रामपंचायत कार्यालय,शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी सजा या ठिकाणच्या सूचना फलकावर देण्यात आलेले आहे. दिनांक १ जानेवारी ते २० जानेवारी अभियानाची अंमलबजावणी २१ जानेवारी ते २४ जानेवारी पडताळणी व २५ जानेवारी रोजी पात्र कुटुंबियांना लेखी स्वरुपात निमंत्रण आणि प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी त्यांचा गौरव व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती आस गाव सरपंच,उपसरपंच व सदस्य आणि ग्रामस्थांनी तसेच ग्रामविकास अधिकारी अनुजा भगत यांनी दिली आहे.
नागरी सुविधांसोबत वैयक्तिक स्वच्छता आणि ग्रामपंचायत कार्यालयातील पाणी व स्वच्छता समितीमार्फत पडताळणी करूनच या निवडी करण्यात येणार असल्याची स्पष्ट केले आहे .निकषाच्या अनुषंगाने निवड केलेल्या कुटुंबांची यादी आसगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. काही लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी पन्हाळ्यात अडवून त्याचा पुनर्वापर केला आहे. घरगुती वापराच्या पाण्याची बचत झाली आहे.

—————————————————–
फोटो -आसगाव ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता अभियान राबवताना ग्रामस्थ व कर्मचारी (छायाजी अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments