निसर्ग_ग्रुप_कराड तर्फे काल दि 21/1/2025 रोजी pd पाटील उद्यान कराड येथे कराड परिसरातील पर्यावरण,निसर्ग,बागप्रेमी महिलांसाठी संक्रांत हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले होते
या उपक्रमात कराड परिसरातील महिला उत्स्फूर्त पणे सहभागी झाल्या या सर्व महिलांना *निसर्ग ग्रुप तर्फे वाण म्हणून कोबी, गोकर्ण याची रोपे व विविध झाडांचे कटिंग* देण्यात आले त्यासोबत सर्वांनी येताना सोबत छोटी रोपे, बिया, कटिंग आणल्या होत्या तीही सर्व महिलांना वाटण्यात आली
यावेळी सौ दिपाली चौधरी मॅडम यांनी फळांच्या साली पासून बायो इन्झाईम कसे बनवायचे व त्याचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व पितळेचा तांब्या बायो इन्झाईम ने कसा स्वच्छ होतो याचे ही प्रात्यक्षिक करून दाखविले
तिळगुळ ची देवाण घेवाण करून सर्वांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला सोबत तिळगुळ घेऊयात आणि शक्य तिथे अविरत निसर्ग सेवा करूयात अशी शपथ घेतली.
सर्व कार्यक्रम खूप छान होण्यासाठी निसर्ग ग्रुप मधील महिला सदस्यांनी खूप मेहनत घेऊन नियोजन केले व इतर सर्वांनी हातभार लावला याबद्दल व या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना व निसर्ग ग्रुप सदस्य यांचे उपस्थित राहिल्याबद्दल शेवटी आभार व्यक्त केले.