Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्रतवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या मुंबई अध्यक्षपदी अरविंद सुर्वे

तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या मुंबई अध्यक्षपदी अरविंद सुर्वे

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी आणि कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीचे कार्यवाह श्री. अरविंद रामकृष्ण सुर्वे यांची तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
“तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबई”ची विशेष सभा १९ जानेवारी २०२५ रोजी कित्ते भंडारी सभागृहाच्या कॉन्फरन्स रूममध्ये घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षपदासह सर्व कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. अरविंद सुर्वे यांची अध्यक्षपदी एकमताने, तर उपाध्यक्षपदी श्री. विजय सहदेव गडदे, खजिनदारपदी श्री. तुषार सदानंद सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली. श्री. अजय वसंत पड्याळ यांना उपसचिवपदावरून सचिवपदी बढती देण्यात आली. तर उपसचिव म्हणून दर्शन मनोहर नार्वेकर यांची निवड करण्यात आली. संपर्कप्रमुख म्हणून श्री. राजेश विद्याधर सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री. अजित गडदे आणि श्री. विनायक नार्वेकर यांचा आधार हरपल्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबईला एकप्रकरे मरगळ आली होती. गेले दीड वर्ष सभाच झाली नव्हती. राजेश सुर्वे आणि अजय पड्याळ यांच्या प्रयत्नांना अरविंद सुर्वे यांची साथ लाभल्यानंतर रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सभेला ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने जमा झाले. “एक है तो सेफ है” हा मंत्रच जणू त्यांना मिळाला.
सभेचे नियमानुसार कामकाज सुरू झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात अली. त्यावेळी श्री. राजेश सुर्वे यांनी अध्यक्षपदासाठी अरविंद सुर्वे यांचे नाव सुचविले. मात्र अगोदरच असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे अरविंद सुर्वे यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली. यावेळी त्यांनी विविध नावांचे पर्यायही सभेपुढे ठेवले. मात्र सभेने अरविंद सुर्वे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. उपाध्यक्षपदी श्री. विजय सहदेव गडदे आणि खजिनदारपदी श्री. तुषार सदानंद सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली. तर सभासदांशी वेळोवेळी संपर्क साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे श्री. राजेश विद्याधर सुर्वे यांची संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
तवसाळ ग्रामस्थ मंडळाला महत्त्वाच्या क्षणी सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. श्री. कुसुमाकर दत्ताराम गडदे, श्री. रमेश राजाराम गडदे, श्री. वीरेंद्र सीताराम सुर्वे आणि श्री. प्रशांत सुभाष सुर्वे अशा महनीय व्यक्तींचा सल्लागार मंडळात समावेश करण्यात आला आहे.

अरविंद सुर्वे यांचे कार्य

●पत्रकारितेत असलेले श्री. अरविंद सुर्वे हे १९८० पासून तवसाळ ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सभासद आहेत. २०१० च्या सुमारास ते संस्थेचे उपाध्यक्षही होते. १९९३ च्या सुमारास ते स्वयंभू गणेश मंदिर जीर्णोद्धार समितीचे सचिव होते. त्यावेळी त्यांनी गणेश मंदिराकडे भाविक आकर्षित व्हावे यासाठी आवश्यक ती प्रसिद्धी केली होती.
◆तवसाळ गावी स्वयंभू गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात १९९० ते २०१८ पर्यंत नाट्याभिनय. “माझ्या सासरच्या मंदिरी” नाटकाने सुरुवात, तर “बेबंदशाही” नाटकाने समारोप.
■महाराष्ट्र शासनाने पत्रकार विशेष गृहनिर्माण योजनेंतर्गत बोरिवलीत बांधलेल्या अक्षर पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेत १९९७ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यरत असताना श्री. अरविंद सुर्वे यांनी कोषाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदापर्यंत सर्व पदे भूषविली आहेत.
★भंडारी समाजाचे मानबिंदू, लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले यांनी स्थापन केलेल्या दीडशे वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या सुविख्यात “कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी” या संस्थेचे सुमारे २०१० पासून श्री. अरविंद सुर्वे हे सभासद आहेत. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर आपल्या कार्यशैलीने अल्पावधीतच त्यांनी सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे संस्था अडचणीत असताना त्यांची सहकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली.
● अरविंद सुर्वे याना “ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज”तर्फे मराठी भाषेतील समर्पित पत्रकारितेसाठी २०१५ मध्ये “दी पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज “कित्ते भंडारी” संस्थेचा कारभार चालवताना त्यांना त्या पुरस्कारामागची भावना उपयोगी पडत आहे.
“कित्ते भंडारी” संस्थेचा कारभार चालवताना अंतर्गत विरोधकांनी त्यांना फार त्रास दिला. त्यांची अवमानकारक बदनामी केली. अरविंद सुर्वे अस्वस्थ झाले; पण विचलित झाले नाहीत आणि संस्थेचा कारभार चालवण्याचा घेतला वसा टाकला नाही. संस्थेचा कारभार फार उत्तम पद्धतीने चालवत आहेत. याकामी त्यांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर कार्याध्यक्ष श्री. सूर्यकांत बिर्जे, पार्टटाइम काम करत असलेल्या दोन महिला कर्मचारी आणि त्यांचा सेवकवर्ग यांची मोलाची साथ मिळाली. “मी तो निमित्तमात्र एक; सर्व काही कर्मचारी आणि सेवक” असे म्हणत संस्थेचा कारभार व्यवस्थित चालण्याचे श्रेय ते कामगार-कर्मचाऱ्यांना बहाल करतात. येणाऱ्या ग्राहकांचे, समाजबांधवांचे ते हात जोडून स्वागत करतात आणि ग्राहक परत जाताना त्यांना धन्यवाद देतात. त्यांच्या विनम्रपणामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे संस्थेत येणाऱ्या ग्राहकांनाही ते आदरणीय वाटतात. “दी पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी”प्रमाणे ते “दी पिलर ऑफ कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी” ठरले आहेत.
●आपल्या जन्मदात्रीसाठी सर्वजण कृतज्ञ असतात, पण अरविंद सुर्वे यांनी आपल्या जन्मदात्रीबरोबरच जन्मदात्यासाठी कृतज्ञ राहत त्यांच्या जीवनावर आधारित “कल्पवृक्षांच्या छायेत” हे पुस्तक लिहिले आहे. त्याला महाराष्ट्र शासनाकडून नवलेखक अनुदानही मिळाले आहे.
◆”कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी” संस्थेप्रमाणेच रावबहाद्दूर सी. के. बोले यांनी भेंडीबाजार अग्निशमन दलाच्या बाजूलाच १८८० मध्ये “जुना नागपाडा-नागोबा मंदिर” उभारले आहे. अरविंद सुर्वे नैतिकदृष्ट्या त्या मंदिराचे सल्लागार मार्गदर्शक आहेत.
■अरविंद सुर्वे यांच्याकडून “तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबई”साठी असेच भरीव कार्य घडो, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षापूर्ती कशी होते ते येणारा काळच ठरवेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments