फलटण : साताऱ्यात लोकशाही तत्व प्रणाली मध्ये न्याय व्यवस्थित इतकाच वैद्यकीय क्षेत्रावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती आहेत . अन्याय होत असेल तर मानवता भावनेतून त्याकडे पाहिले जाते. परंतु फलटण येथील मुलाचा उजवा पाय गुडघ्याच्या खाली हलगर्जीपणामुळे कापण्याची वेळ आली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर चौकशी करून तातडीने कारवाई करण्यासाठी मुलाचे वडील संतोष दत्तात्रय राऊत राहणार सासवड तालुका फलटण यांच्यावर प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे.
रविवार दिनांक ३ मार्च २०२३ रोजी महाबळेश्वरला फलटण वरून राऊत कुटुंबीय फिरायला जात असताना पसरणी घाटात दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये अकरा वर्षाचा शंभूराजे राऊत याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. पाचगणी मध्ये उपचारानंतर त्याला फलटण येथील एक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या पायावर ६ मार्चला शस्त्रक्रियाही करण्यात आली. परंतु त्याचे पाय सुजत असल्यामुळे व वेदनेने तो तडफडत असताना उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला. या सर्व प्रकारामुळे जखम बळवल्यामुळे शंभूराचा उजवा पाय कापावा लागला. बारा वर्षाचा शंभूराज राऊत याचा पाय कापावा लागल्यामुळे त्याचे वडील संतोष दत्तात्रय राऊत यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी सहा महिने पाठपुरावा केला. पण, अद्यापही त्यांना पुरोगामी सातारा जिल्ह्यातील प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही. उलट वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही चौकशी समिती न नेमता सदर डॉक्टरला पाठीशी घालण्यातच धन्यता मानलेले आहे. या सर्व गोष्टीला कंटाळलेल्या पालक संतोष राऊत यांनी प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी राऊत कुटुंबीय साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालना बाहेर सामुदायिक आत्मदहन करण्यार असल्याची सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे . माणुसकी लोप पावली असून अनेकांवर अन्याय होत असला तरी काही व्यवसाय कारणामुळे त्यांना न्याय देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. याच्या वेदना सध्या राऊत कुटुंबीय भोगत आहे. सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी व्यथा मांडली. आपले घरामध्ये कुणीतरी एखाद्या व्यक्तीला चुकीच्या उपचार पद्धतीने जर शरीराचा एखादा अवयव जर नष्ट झाला तर त्याला आयुष्यभर अपंगत्व स्वीकारावे लागते. याची भान आता राहिलेले नाही. अशी खंत श्री संतोष राऊत व सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी व्यक्त केलेले आहे.
प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करून काही वेळेला त्यांची फसगत करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त केले जाते. ही बाब लोकशाहीला घातक असून याबाबत किमान राज्यकर्ते व अधिकारी यांनी मानवता भावनेतून पाहावे. अशी मागणी श्री राऊत व वाघमारे यांनी केलेले आहे.
…………………………..
फोटो – स्वतःच्या पायावर उभा असलेला शंभूराज राऊत व हलगर्जीपणामुळे गमावलेला पाय
डॉक्टरच्या हलगर्जी पणाने पाय गमावलेल्या वडिलांवर साताऱ्यात आत्मदहनाची वेळ
RELATED ARTICLES