Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्र४२वी मातोश्री रमाबाई आंबेडकर आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

४२वी मातोश्री रमाबाई आंबेडकर आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

प्रतिनिधी : सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सांस्कृतिक मंडळातर्फे *’सोशल मीडियावरील महिलांचे चित्रण’* (Dipiction of Women in Social Media) या विषयावर ४२ वी मातोश्री रमाबाई आंबेडकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मंगळवार, दि. २१/१/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये होती. सकाळी ठिक ११ वाजता उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर यांच्या हस्ते मातोश्री रमाबाई आंबेडकर व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व बूद्धाच्या मुर्तीला पुष्प वाहून स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेच्या सुरुवातीला डॉ. समीर ठाकूर यांनी उपस्थित स्पर्धकांना स्पर्धेचे नियम वाचून दाखवले. तसेच त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या कर्तुत्वाबद्दल सर्वांना थोडक्यात मार्गदर्शन केले, तसेच गेली ४२ वर्षे अखंडपणे चालू असलेल्या या स्पर्धेबाबत थोडक्यात माहिती दिली. सदर स्पर्धेत एसएनडीटी आणि मुंबई विद्यापीठाशी सलग्न १७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत पहिले पारितोषिक SNDT कॉलेजच्या *कु. साक्षी राजेश वाघमारे* या विद्यार्थिनीने पटकावले, तिला फिरता चषक व रोख बक्षीस ₹२००० आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तिने मराठीत भाषण केले.

द्वितीय पारितोषिकदेखिल SNDT च्याच *कु. दिव्या दास* या विद्यार्थिनीने जिंकले, तिला रोख पारितोषिक ₹१५०० आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात केले, तिने इंग्रजीत भाषण केले. हिंदी भाषेसाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक गुरूनानक कॉलेजच्या, *कु. गूरुप्रसाद यादव* या विद्यार्थ्याला रोख रु. ७५० व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सर्व सहभागीं विद्यार्थांनी महिलांचे समाज माध्यमातील चित्रण या विषयावर त्यांची अभ्यासपूर्ण मते प्रभावीपणे व आत्मविश्वासाने मांडली.
या स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून डॉ. विष्णू भंडारे, डॉ. भावना राठोड आणि प्रा. छाया पावसकर यांनी काम पाहिले. त्यांनी उपस्थित स्पर्धकांना वकृत्व स्पर्धेत भाग घेतल्याने संवाद कौशल्य व लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलण्याचे साहस वाढते, असा अभिप्राय दिला व सदर विषय अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने फक्त ७ मिनीटात सादर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक मंडळाच्या सर्व प्राध्यापकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले महीनाभर भरपूर परिश्रम घेतले.

*मुंबई प्रतिनिधी – डॉ. विष्णू भंडारे*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments