सातारा(अजित जगताप)
: सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. यासाठी तात्कालीन पालकमंत्री अजित दादा पवार व सामाजिक कार्यकर्ते तथा विकासक राजेंद्र चोरगे यांनी अत्यंत देखणी असे सातारा बस स्थानक शेजारी श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियमची उभारणी केली.
आज या शाहू स्टेडियमची दुरावस्था झाली असून अनेक खेळाडू ताटकळ असतात. तर क्रीडा प्रशासन उंच उड्या मारत आहेत का ? याची फिकीर ना अधिकारी, ना काही क्रीडा प्रेमींना…असे सध्या तरी अनेक खेळाडूंमध्ये चर्चा होताना दिसत आहे.
ग्रामीण भागातील अनेक खेळाडू सुविधा मिळाव्यात .या हेतूने या श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियमकडे आशाळभूतपणाने पाहत आहेत .परंतु, सध्या या स्टेडियमचा ताबा पेज थ्री व उच्चभ्रू समाजातील काही ठेकेदारांनी घेतल्याचे तेथील काही फलकावरून स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात स्टेडियमच्या उभारणीसाठी ज्यांनी हातभार लावलेला आहे. त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जात आहे. खेळाडूंना मोठे ध्येय गाठण्यासाठी सरावाची सुविधा असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच स्टेडियमची उभारणी झाली. यासाठी काही कोटी रुपये खर्च झाले. परंतु अद्यापही महाराष्ट्रामध्ये नावलौकिक प्राप्त करणारे खेळाडू निर्माण करण्यास अपयश आलेले आहे. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होत आहे त्याच्या सर्वांसाठी कुस्तीगीरांना जागा नसल्याने पण या ठिकाणी त्याचा लवलेश नाही.
राज्य पातळीवर चमकण्यासाठी खेळाडूंना सुविधा देणे हे महत्त्वाचे आहे .कबड्डी, खो-खो, कराटे, बॅडमिंटन, कुस्ती ,बॉक्सिंग, क्रिकेट यासह इंडोर खेळ तसेच इतर खेळांचा सराव करण्यासाठी खेळाडूंना सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक जण बारामती, पुणे, बालेवाडी, कोल्हापूर, सांगली, विटा, मुंबई ,नवी मुंबई या ठिकाणच्या क्रीडा संकुल व अकॅडमी ला जाऊन आपल्या कलागुणांना व खेळाला प्रोत्साहन देत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री झाल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झालेले आहेत.
भारतीय प्रजासत्ताक दिन या ठिकाणी ध्वजारोहण व अनेक विविध प्रकारचे शोभयात्रा व रथयात्रा निघते. त्यापूर्वी एकदा सातारचे कर्तव्यदक्ष असणारे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या शाहू स्टेडियमला भेट देऊन उपयुक्त अशा सूचना कराव्यात. अशी मागणी खेळाडूंनी केलेली आहे.
या स्टेडियमच्या विकासासाठी व प्रशासकीय मान्यतेसाठी निधीची आवश्यकता आहे. ही वस्तुस्थिती प्रसारमाध्यमापर्यंत सांगण्याचे धारिष्ट सुद्धा नसल्यामुळे खेळाडूंनीच आपल्या समस्या मांडून ही बाजू समोर आणलेली आहे. दरम्यान, आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सविस्तर भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका समजू शकले नाही. त्यांनी बघतो… पाहतो… असे सांगून एका कार्यक्रमात जाण्यासाठी त्यांनी घाई केली. असे काही क्रीडा प्रेमींनी सांगितले.
———–&——————————–
फोटो -साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियमची झालेली दुरावस्था (छाया- अजित जगताप, सातारा)