Friday, August 22, 2025
घरमहाराष्ट्रनेताजी सुभाषचंद्र बोस यांना ग्रंथ श्रद्धांजली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ग्रंथ श्रद्धांजली

मुंबई(रमेश औताडे) : आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने ” चेका द रोड ऑफ बोन्स ” या पुस्तकाचे प्रकाशन लेखक सर्वोच्च न्यायालय ऑल इंडिया लीगल एड फोरमचे सरचिटणीस तसेच आंतरराष्ट्रीय न्यायपरिषदचे सदस्य जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे करण्यात आले.

हे पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढपूर्ण गायब होण्याची कहाणी आणि त्यांचा शेवटचा प्रवास याविषयी आहे. लेखकाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की ,१८ ऑगस्ट १९४५ नंतर नेताजी सोव्हिएत युनियनमध्ये (सध्याच्या रशियामध्ये) होते. त्यांनी सोव्हिएत युनियनमधील बुलार्क या प्रदेशात आश्रय घेतला होता आणि नंतर त्यांना सायबेरियातील ओम्स्क शहराच्या याकुत्स्क तुरुंगात सेल क्रमांक ५६ मध्ये ठेवण्यात आले होते असे मुखर्जी यांनी सांगितले.

लेखकाने सोव्हिएत सैन्याच्या क्रूरतेचा उल्लेख केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, सोव्हिएत सैन्य आणि केजीबीने कैद्यांवर अमानुष वागणूक दिली. सायबेरियामध्ये -३०°C थंडीत कैद्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृतदेहांची दफनभूमी ओब नदीजवळच्या मार्गावर करण्यात आली. त्या मार्गावर “रोड ऑफ बोन्स” हा रस्ता बांधण्यात आला.

लेखकाने न्यायमूर्ती मनोज के. मुखर्जी आयोग आणि न्यायमूर्ती सहाय आयोगाच्या अहवालांचा संदर्भ देऊन असे मांडले आहे की नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात झाला की नाही याची खात्री नाही. रेनकोजी मंदिरातील अस्थी नेताजींच्या नाहीत आणि गुमनामी बाबा हे नेताजी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे सोव्हिएत युनियनचा इतिहास लेखकाने भारत सरकारने रशियन सरकारकडे नेताजींच्या शेवटच्या प्रवासाविषयी सत्य उघड करण्याची विनंती करण्याचा आग्रह धरला आहे.

लेखकाने सर्व उपस्थित मान्यवर आणि नेताजी प्रेमींना विनंती केली आहे की त्यांनी केंद्र सरकारकडे रशियन सरकारशी चर्चा करण्याचा आग्रह करावा. तसेच, आय एन ए सैनिकांच्या (आझाद हिंद फौज) स्मरणार्थ नवी दिल्लीतील राजपथावर युद्धस्मारक उभारावे, अशी मागणी केली आहे. लेखकाचा विश्वास आहे की सध्याचे सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल योग्य न्याय करेल आणि त्यांच्या बलिदानाला योग्य आदर करेल असे मुखर्जी म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments