सातारा
(अजित जगताप ) : महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठे प्रयत्न होणे गरजेचे आहे. महिला बचत गट आता विविध वस्तूंची निर्मिती करीत आहेत. सामान्य व्यक्ती व कर्मचारी मनमुराद त्या वस्तू खरेदी करत आहेत. आता बचत गटाकडून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांकडून जिल्हा परिषदेच्या मैदानावर मानिनी जत्रेतून खरेदी करण्याची ”””’ महिला वर्गाकडून वाढलेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर उमेद महिला बचत गटाच्या मिनी सरस माननीय जत्रेचे उद्घाघाटन झाले आहे. दि:२१जानेवारीपर्यंत सुमारे ७९ महिला बचत गटाने विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत. या ठिकाणी सामान्य सातारकर व काही कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मनमुराद खरेदी करत आहेत. परंतु, लोकप्रतिनिधी व काही अधिकारी वर्गाचे कुटुंबीय मॉलमध्ये खरेदी करून प्रतिष्ठा जपत आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील महिला गटाला सक्षमीकरण करण्यासाठी या ठिकाणी येऊन खरेदी करावी व त्याची सेल्फी आपल्या मोबाईल मध्ये ठेवल्यास त्यांची प्रेरणा घेऊन अनेक जण खरेदी करतील. असा सार्थ विश्वास महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मानिनी जत्रेमध्ये विविध उत्पादने व त्यांना मिळणारा प्रतिसाद उदंड आहे. पण लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी खरेदी करावी. ही उमेद आहे. ही उमेद पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं अशा जत्रेला यश मिळेल. अन्यथा अंधेरी नगरी, चौपट राजा… नुसताच वाजंत्री वाजवतात…. बँड बाजा… असं त्याच्या सुरू होऊ नये. अशी विनंती महिला बचत गटाच्या पदाधिकारी व खरेदीसाठी आलेल्या वैशाली जाधव, दिपाली माने, करिष्मा सय्यद, नम्रता पवार यांच्यासह अनेक महिलांनी केलेली आहे.
या मानिनी जत्रेसाठी सातारा जिल्हा परिषद तसेच विविध विभागातील विभाग प्रमुखांनी दुपारच्या वेळेला कर्मचाऱ्यांना सूट दिलेली आहे. या कालावधीमध्ये विशेषतः महिला कर्मचारी सातारा जिल्हा परिषद मैदानावरील स्टॉलमध्ये येऊन खरेदी करत आहेत .ही सुखद बाब आहे. असाच नजराना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयाबाबत दिसावा. अशी गरीब व कष्टकरी महिला बचत गटाच्या कारागिरांनी स्पष्ट केले आहे.
या मानिनी जत्रेसाठी माण खटाव पासून ते महाबळेश्वर पाचगणी पर्यंतच्या अनेक माता-भगिनींनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने जत्रा फुलवलेली आहे . या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केले असून खरेदीमध्ये सुद्धा आता आपलं कौशल्य दाखवावे आणि ही यात्रा यशस्वी करावी. अशा पद्धतीने योजनाबद्ध कार्यक्रम व्हावा. हीच श्रीची इच्छा असल्याचे बोलले जात आहे..
__________________________________
फोटो.. सातारा येथील मानिनी जत्रेतील सामान्य माणसांची खरेदीसाठी झुंबड (छाया- अजित जगताप, सातारा)