Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रपिंपरीत ४०० एकरवर होणार निरंकारी संत समागम - २४ जानेवारीपासून निरंकारी संत...

पिंपरीत ४०० एकरवर होणार निरंकारी संत समागम – २४ जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम

प्रतिनिधी : संत निरंकारी बाबा यांचा समागम ५८ वा. सोहळा २४, २५,२६ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथील पिंपरी येथील ४० एकर मैदानावर होत असून या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागी पिंपरी : विश्वबंधुत्वाचे ब्रीद जपत अखिल विश्वाला ब्रह्मज्ञानाद्वारे एकत्वाची शिकवण देणाऱ्या संत निरंकारी मिशनचा महाराष्ट्राचा ५८वा निरंकारी संत समागम पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे ४०० एकरच्या विस्तीर्ण जागेवर आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २४ ते रविवार २६ जानेवारी २०२५ दरम्यान हा भव्य आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार असून २७ जानेवारीला सामूहिक लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात मुख्य सत्संग दररोज दुपारी २ वाजता सुरू होईल ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार आणि कवी सद्‌गुरू आणि ईश्वराप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. त्यानंतर गेल्या एक महिन्यांपासून महाराष्ट्रासह इतर राज्यांतून निरंकारी भक्तगणांनी समागम स्थळावर येऊन आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळाला एका सुंदर नगरीच्या रूपात परिवर्तित केले आहे. संतसमागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि रेल्वे स्थानक व बसस्थानकातून ये-जा करण्यासाठीवाहतूक सेवा इत्यादीची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम स्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रकाशन विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडवण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनीबरोबरच एकूण आठ कार्यशाळा असलेली भव्य बाल प्रदर्शनीदेखील मैदानावर उभारण्यात आली आहे. रात्री ८ वाजल्यापासून सद्‌गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे अमृतप्रवचन होणार आहे.

या संत समागमामध्ये देश- विदेशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीची व सार्वभौमत्वाची छटा उमटलेली पाहायला मिळेल आणि यामध्ये सहभागी होणारे समस्त भाविक भक्तगण अलौकिक आनंदाची प्राप्ती करत सद्‌गुरू व संतांच्या दिव्य वाणीने प्रभावित होऊन आपल्या जीवनाच्या मूळ उद्देशाकडे अग्रेसर होत प्रेमाभक्तीच्या भावनेचा विस्तार करतील, अशी आशा निरंकारी मंडळाच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाचे समन्वयक प्रिमल सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments