प्रतिनिधी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता अलिबाग मधील पेजारी गावातील बौद्ध विहारात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मध्ये कार्यरत असणारे श्रीमती.एस.आर.म्हसकर-(जिल्हा व्यवस्थापक) -महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रायगड, प्रज्ञेश भगत -कर्मचारी,सागर थळे(कर्मचारी),सौ.वर्षा म्हात्रे( महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रायगड) यांनी ग्रामस्थांना या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निशा ओवाळ यांनी केले.यावेळी रमाई महिला मंडळच्या माजी अध्यक्ष सौ.रत्नप्रभा हिराजी जाधव तसेच मंडळातील सदस्या उपस्थित होत्या या प्रसंगी अलिबाग तालुका बौद्धजन पंचायत समितीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विकास जाधव तसेच प्रकाश गायकवाड,आशिष जाधव यांच्या समवेत ग्रामस्थांचा सहभाग होता.
अलिबाग मधील पेजारी गावात रोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न
RELATED ARTICLES