कोरेगाव : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता स्वातंत्र्य बंधुत्वाचा नारा दिलेला आहे. त्याचा अंतर्भाव राजमुद्रा व संविधानामध्ये असल्यामुळेच कोरेगाव मध्ये राजमुद्रा व संविधान उद्देशिकेसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
खरं म्हणजे शासकीय कामामध्ये अंतर्भूत असलेल्या संविधान उद्देशिकेकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्याला वेतन घेण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेली आहे.
राजमुद्रा व संविधान उद्देशिकेचा अवमान करणाऱ्या कोरेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करा. अन्यथा २६ जानेवारी २०२५ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वाराजवळ आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे. असे त्यांनी नमूद केले आहे.
कोरेगाव प्रांत व तहसील कार्यालय येथील राजमुद्रा पडून तुटली असता नवीन बसवण्या करिता चार महिने प्रांत व तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता यांच्या पाठीमागे लागले होते, तसेच संविधान उद्देशिका कार्यालयाबाहेर लावण्याकरता सुद्धा वारंवार लोकशाही मार्गाने संपर्क साधला होता. परंतु उपअभियंता यांनी राजमुद्रा व संविधान उद्देशिका यांना कोणतेही
स्थान दिले नाही. चार महिने पाठपुरावा करून देखील त्यांनी या दोन्ही गोष्टी या कार्यालयात दिलेल्या नाहीत.
स्वखर्चाने प्रांत व कोरेगाव तहसीलदार यांनी राजमुद्रा व संविधान उद्देशिका आपल्या नवीन इमारतीमध्ये बसवली. या इमारतीचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग कोरेगाव उपअभियंता यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनीच राजमुद्रा व संविधान उद्देशिका बसवणं गरजेचं होते.
राजमुद्रा व संविधान उद्देशिका याचा
अवमान करून याविषयी त्यांच्या मनामध्ये कसलेही स्थान नाही. हे त्यांच्या हलगर्जीपणा निष्काळजी पण येथून स्पष्ट दिसून येत आहे.
ज्या संविधानामुळे नोकरी व वेतन मिळत आहे, याची सुद्धा जाण उपाभियंता यांना नाही, लोकशाही मार्गाने पाठपुरावा करून देखील चार महिन्यात यांना राजमुद्रा व संविधान उद्देशिका बसवता आली नाही. त्यांच्या नाकर्तेपणाचाच पुरावा आहे. तरी त्यांना तात्काळ निलंबित करावे व फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे व कार्यकर्त्यांनी केलेले आहे. दरम्यान, याबाबत सातारा जिल्ह्यातील चार मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असल्याचे समजते.
————————————
फोटो राजमुद्रा व संविधान उद्देशिका बाबत माहिती देताना श्री रमेश अनिल उबाळे