Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्र"यशमंत्र सरकारी नोकरीचा" मार्गदर्शन शिबिराचा यशस्वी समारोप 

“यशमंत्र सरकारी नोकरीचा” मार्गदर्शन शिबिराचा यशस्वी समारोप 

कांजुरमार्ग(पंकजकुमार पाटील): येथील गाबीत समाज संस्थेच्या वतीने “यशमंत्र सरकारी नोकरीचा” मार्गदर्शन शिबिर रविवार दि १२ जानेवारी २०२५ रोजी संस्थेच्या कांजुरमार्ग(पुर्व ) येथील गाबीत समाज भवनात उत्साहात पार पडले. या शिबिरात सन्मा. श्री विष्णू बाळ धुरी यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन लाभले व त्यांनी सरकारी नोकरी संदर्भात विविध विषयांवर माहिती देऊन परीक्षेत यश कसे मिळवावे हे सांगून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
दहावी पास तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्षात येणाऱ्या विविध राज्य सरकारी, केंद्र सरकारी, भारतीय रेल्वे व बँकेतील नोकरी विषयक माहीती व संधी, सरकारी नोकरीचा फॉर्म कधी, कुठे व कसा भरावा ? ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर परिक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यास कसा करावा या संबंधी त्यांनी शिबिरात सविस्तर माहिती दिली.
यावेळी गाबीत समाज संस्थेच्या वतीने मार्गदर्शक श्री विष्णू धुरी यांचे आभार मानून त्यांना सन्मानित करण्यात आले . तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित विद्यार्थ्यांना भेटवस्तू व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमास गाबीत समाज संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. तसेच या पुढेही विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय गाठण्याकरिता त्यांना चांगल्या विचारांनी प्रेरित करण्यासाठी असे नवनवीन कार्यक्रम आखण्याचा संस्थेचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments