प्रतिनिधी :- महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावच्या श्री जननी वरदायणी देवीची वार्षिक यात्रा शनिवार ११ व रविवार १२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
सदर प्रसंगी पहिल्या दिवशी ग्रामदैवताचा अभिषेक, पालखी सजावट, दैवताच्या काठीला हळद लावणे , नवस बोलणे व ढोल ताशांच्या गजरात तसेच पारंपारिक लेझीम खेळ खेळून घरोघरी पालखीची मिरवणूक काढली . ५ गावच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पालख्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत केले. पंचक्रोशील उपस्थित लेझीम मंडळांनी लेझीम खेळाचे डाव मांडले. नंतर रात्री देवीच्या मंदिरात जागरण गोंधळ या कार्यक्रमात दिवट्या नाचवून दैवताच्या नावाचा जयघोष केला गेला व सुवासिनींची ओटी भरून त्यांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर मनोरंजन म्हणून लोकनाटय तमाशातील गाण्यांचा कार्यक्रम पार पडला . तर दुसऱ्या दिवशी सकाळी तमाशाच्या कलाकारांनी प्रबोधनात्मक वगनाट्य लावून उपस्थितांचे मनोरंजन केले . दुपारी ४:३० ते ६ः३० जंगी कुस्त्यांचा फड पार पडला. सातारा – वाई – पांचगणी – जावली – महाबळेश्वर इत्यादी ठिकाणचे नामवंत पैलवान यांनी आपल्या मातीतील खेळाची कला कुस्तीरुपाने दाखवून पंचक्रोशीतील कुस्ती – क्रिडा प्रेमींची मने जिंकली .
ग्रामस्थ मंडळ लाखवड यांनी भाविकांना सर्वांना धन्यवाद दिले .
लाखवड गावची श्री जननी वरदायणी देवीची यात्रा उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES