प्रतिनिधी – शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाऊचा धक्का येथे सर्व पदाधिकारी आणि वाहतूक दणांसोबत आंदोलन केले. वाहतूकदारांना अटल सेतूवरून येताना आणि जाताना किमान 3000 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे हा भूखंड इतका मोठ्या प्रमाणात आहे की वाहतूकदार आपली कुटुंब उदरनिर्वाह देखील करू शकत नाहीत. तरी शासनाने याचा विचार करावा आणि हा अगोदर दंड त्वरित बंद करावा यासारख्या अनेक विविध समस्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या. लवकरच आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन आमच्या विविध समस्या त्यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष अशोक टाव्हरे, जनरल सेक्रेटरी सूर्यकांत तांडेल आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अवजड वाहतूकदरांच्या समस्या सोडवणार – उदय दळवी
RELATED ARTICLES