विंग ता.कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची शाळा व्यवस्थापन समिती,मुख्यापक,शिक्षक,ग्रामस्थांची मॉडेल स्कूल आणि पी एम् जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसणला आवर्जून भेट.
महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कराड तालुक्यातील काही प्राथमिक शाळांचा आदर्श शाळांमध्ये (मॉडेल स्कूल) मध्ये समावेश केला असून यापैकी विंग प्राथमिक केंद्र शाळेचा समावेश आहे.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची गुणवत्ता,भौतिक सुविधांनी प्रगत असलेली तुळसणची प्राथमिक आदर्श शाळा म्हणून सर्वत्र ख्याती आहे.
तुळसण शाळेचा लोकसहभाग,ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भौतिक सुविधा, शासनाच्या माध्यमातून पूर्ण झालेली नवीन इमारत,नव्याने दुरुस्ती झालेल्या वर्गखोल्या,नवीन शौचालय, मनरेगा मधून बांधकाम झालेली भव्य आकर्षक संरक्षक भिंत,त्याचबरोबर शाळेचे नव्यानेच होत असलेले क्रीडांगण इ.बाबींची माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी विंग येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गायकवाड मॅडम,उपशिक्षक गरूड सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विकास होगले,उपाध्यक्षा सौ उज्वला ढोणे,सदस्य श्री विजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्य श्री विकास खबाले यांनी तुळसण शाळेला भेट दिली.
भेटीदरम्यान पाहुण्यांनी इ.१ली ७ वी पर्यंतच्या सर्व वर्गांची माहिती करून घेतली.
डिजिटल वर्ग,वर्गातील स्मार्ट टी.व्ही.वर्च्युअल क्लासरूम,रोबोटिक लॅब, संगणक कक्ष,प्रयोगशाळा,वाचनालय,
नवोदय,स्कॉलरशिप,क्रीडास्पर्धा,बुध्दिबळ,वक्तृत्व स्पर्धा,तालुकास्तर,जिल्हा स्तरावर चमकणारे विद्यार्थी आदी सर्व प्रकारच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने विंग शाळेच्या मुख्याध्यापिका,शाळेच्या अध्यक्ष,ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन तुळसणच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक शा.स.व्य.समिती,ग्रामपंचायतआणि तुळसणकर ग्रामस्थांचे शतशः कौतुक करून आभार मानले.तर इ.७ वी ची कु.पृथ्वी संजय माने या विद्यार्थीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर केलेल्या वक्तृत्वाने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली
यावेळी तुळसण शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री रामकृष्ण थोरात सरांनी लोकसहभाग,ग्रामपंचायत,शासन,माजी विद्यार्थी,परगावाची दानशूर देणगीदार मंडळी,शिक्षणप्रेमी यांच्या माध्यमातून होत असलेली शाळेच्या प्रगती याबद्दल संपूर्ण माहिती देवून पाहुण्यांना मार्गदर्शन केले.स्पर्धा परिक्षा, क्रिडा परिक्षांबाबत शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.शोभाताई गुरव मॅडम आणि उपशिक्षक श्री राजेंद्र चव्हाण सर यांनी आपल्या अष्टपैलू ज्ञानाने संपूर्ण माहिती दिली.तर सौ. खवळे मॅडम,सौ.गाडे यांनी शाळेची परसबाग,सांस्कृतिक कार्यक्रम,स्वच्छता,शाळेतील विविध मेळाव्याबाबत माहिती दिली.त्याचबरोबर या विज्ञानयुगात विद्यार्थी कसा घडला पाहिजे,मराठी शाळेचे महत्त्व,पालक-शिक्षक संवाद याविषयी मार्गदर्शन करून श्री राजेश गिलबिले सरांनी विंग प्राथमिक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका,शाळा व्यवस्थापन समिती,विंगकर ग्रामस्थ यांचे तुळसण शाळा भेटीबाबत आभार व्यक्त केले.
तुळसण येथील आदर्श शाळेला शिक्षण समितीची आवर्जून भेट
RELATED ARTICLES