प
्रतिनिधी :ए पी एम सी कांदा बटाटा मार्केट येथे वारणार टोळी ५१८९ (१०) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे ९ वे वर्ष होते. त्याचप्रमाणे या सत्यनारायण महापूजा निमित्त उमंग सेवा संस्थेचे संस्थापक कैलासवासी योगेश गावडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते त्यानुसार यावेळी सुद्धा १०० पेक्षा जास्त रक्तदात्यानी आपले अमूल्य असे रक्तदान केले.यासाठी अध्यक्ष राजू जुनगरी टोळी मुकादम त्याचप्रमाणे सचिव विलास संकपाळ खजिनदार सागर कदम आणि त्यांचे सहकारी असणारे सर्व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले. सदर श्री सत्यनारायण महापूजेच्या महाप्रसादानिमित्त या ठिकाणी माथाडी कामगार नेते माजी आमदार शशिकांत शिंदे, खासदार डॉ. संजीव नाईक, राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियन त्याचप्रमाणे प्राणा फाउंडेशनच्या प्राची पाटील मॅडम, ऋषिकांत शिंदे, तसेच स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम,धनवर्षा नागरिक सहकारी पतसंस्थेचे साहेबराव शेलार, बीजेपी चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीएसआय शिंदे साहेब, माथाडी युनियनचे सर्व पदाधिकारी सी आर पाटील शेठ, निशांत भगत, त्याचप्रमाणे कोपरखैरणे तुर्भे वाशी नेरूळ ऐरोली बेलापूर या विभागातील नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्य कार्यक्रमाकरिता उपस्थिती दर्शविली होती.
ए पी एम सी कांदा बटाटा मार्केट येथे वारणार टोळी ५१८९ (१०) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व सत्यनारायण पूजा संपन्न
RELATED ARTICLES