मुंबई
: ताडदेव येथील देविच्या उत्सवातून नावारूपाला आलेल्या राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यास आणि जसलोक रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पार पडलेले रक्तदान शिबीर विभागात लक्षवेधक ठरले.सध्या मुंबईतील अनेक इस्पितळांमध्ये रक्ताची कमतरता भासू लागली आहे,ही गोष्ट लक्षात घेऊन राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यासाने पुढाकार घेतला आणि ताडदेव,साने गुरुजी मार्गावरील,बने कंपाऊंड मधील मुंबई महापालिकेच्या तळमजल्यावर एक जेम्बो रक्तदान शिबीर पार पाडले.अध्यात्माच्या मार्गाने जनसेवा करण्याच्या संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.संस्थेचे अध्यक्ष अतुल सूर्यकांत विचारे, सचिव हर्षल शंकर गुरव, खजिनदार जितेंद्र अनंत घाडी यांच्या या कामीचे श्रम विशेष महत्त्वपूर्ण ठरले आहेत.जसलोक इस्पितळाचे डॉक्टर आणि व्यवस्थापनाचेही सहकार्यही विशेष महत्त्वपूर्ण ठरले आहेत.चैत्र महिन्यात साज-या होणा-या राजराजेश्वरी आईंच्या उत्सवाने भाविकांच्या मनात आधिच औस्त्युक्य निर्माण केले आहे.हा उत्सव येत्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी पुन्हा संपन्न होणार आहे!