Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रशालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद ; वायंगणकर साई कला क्रीडा सांस्कृतिक...

शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद ; वायंगणकर साई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

मुंबई, दि.८ (प्रतिनिधी) : 12 जानेवारी या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती आणि स्वामी विवेकानंद स्मृती दिन तसेच 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिन या दिनांचे औचित्य साधून वायंगणकर साई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध शाळांच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या भव्य चित्रकला स्पर्धेचा प्रारंभ आतंकवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे माजी पोलीस निरीक्षक श्री मंगेश नाईक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन झाला. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, शिवभक्त श्री राजु देसाई, सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री महादेव रानडे, चित्रकार श्री जितेश घायवट, ज्येष्ठ समाजसेवक श्री किशोर राऊत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते. स्पर्धेसाठी संपूर्ण नियोजन मालवणी महोत्सव समिती, मागाठाणे मित्र मंडळ, आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ यांच्या अधिपत्याखाली झाले. या चित्रकला स्पर्धेत
मंगुभाई दत्तानी विद्यालय, योजना विद्यालय, सुविद्या प्रसारक संघ, हरीराम चौगुले हायस्कूल, गोखले हायस्कूल,
चौगुले हायस्कूल, मुंबादेवी हायस्कूल, विद्या विकास सभा, बिमा नगर हायस्कूल, शैलेन्द्र हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल, ठाकुर पब्लिक स्कूल, युनिव्हर्सल हायस्कूल,
अवर लेडी ऑफ रेमिडी, सेंन्ट ऐनिज हायस्कूल, शिवसेवा सामाजिक शैक्षणिक संस्था, जयाबेन हायस्कूल, मागाठाणे मनपा शाळा, सेंट लॉरेन्स हायस्कूल, श्री श्री रविशंकर हायस्कूल, रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, आर एस एम स्कूल, दहिसर विद्या मंदिर,
गुंडेचा हायस्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments