मुलुंड प्रतीनीधी : सतिश वि.पाटील
जगभरातील गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल सारख्या कंपन्यांना AI टेक्नॉलॉजीची चीप पुरवणारी NVIDIYA ही एक नंबरची अमेरीकन कंपनी आहे. 4 ट्रिलीयन (4 लाख करोड ) बजेट असणाऱ्या या कंपनीचा मालक जेन्सन हुआन याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपले विटावा कोळीवाड्यातील बांधव संजय केणी यांची मुलगी कु. मानसी संजय केणी या कंपनीत AI चीप डेव्हलेपमेंट करणाऱ्या टीमची हेड आहे. नुकतंच कु. मानसी संजय केणी हिचं जेन्सन हुआन यांनी तिच्या कामा बद्दल विशेष कौतुक केलं. ही आपल्या कोळी जमातीसाठी, विटावा कोळीवाड्यासाठी आणि मानसीच्या आई-वडीलांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
येत्या काही वर्षांत भारतात प्लांट चालू करण्याचा या कंपनीचा विचार असून त्या निमित्त सर्वे करण्यासाठी येणाऱ्या टीम मध्ये कुमारी मानसी संजय केणी हिचा समावेश करण्यात आला आहे.याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.
कु.मानशी संजय केणी हीची गुगल भरारी
RELATED ARTICLES