Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरश्रीक्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेला लाखोंची गर्दी;गुलाल खोबऱ्याची उधळण करत नाईकबाच्या नावानं चांगभलं...

श्रीक्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेला लाखोंची गर्दी;गुलाल खोबऱ्याची उधळण करत नाईकबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष

प्रतिनिधी : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाची यात्रा “नाईकबा च्या नावानं चांगभलं “च्या गजरात आणि गुलाल खोबर्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. श्री क्षेत्र बनपूरी ता.पाटण येथील श्री नाईकबा देवाची यात्रेनिमित्त बनपुरी येथील नाईकबा डोंगरावर भक्तजना जनसागर उसळला होता भाविकांच्या मध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी हजारोंच्या संख्येने स्वतः च्या,व मिळेल त्या वाहनाने बैलगाडी ने भक्त नाईकबाच्या डोंगर माथ्यावर दाखल झाले होते. चैत्र शुद्ध पंचमी शनिवारी दि.१३ एप्रिल हा देवाचा नैवद्याचा दिवस तर चैत्र शुद्ध षष्ठी रविवारी दि १४ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवशी देवाचा पालखी सोहळा पहाटे संपन्न झाला. महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बनपूरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाईकबा पठारावर ६० ते ७० सासनकाठ्यां येतात त्यात मानाची समजली जाणारी कराड येथील रैनाक व शिंदे यांच्या सासनकाठीचे गुढीपाडव्या पुर्वीच दाखल झाली होती. सासनकाठीचे कराड ते नाईकबा पठारापर्यंत कुसुर, काढणे, खळे ,मालदन, कुंभारवाडा मंदुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी येथे स्वागत व पुजन करण्यात आले.
रविवारी १४ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस होता या दिवशी पहाटे देवाचा पालखी सोहळा आणि नाईकबा च्या नावाचा गजर सुरू झाला पालखी,सासनकाट्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली.नाईकबाचा डोंगर गुलाबी रंगाने उधळून गेला होता. सासनकाठ्या वाद्यांच्या गजरात नाचवले जात होत्या या सोहळ्यानंतर देवाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments