Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रपत्रकाराने हिटलरशाही विरोधात उभे राहावे !ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांचे आवाहन

पत्रकाराने हिटलरशाही विरोधात उभे राहावे !ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांचे आवाहन

मुंबई : हिटलरशाहीच्या कालखंडाचा पत्रकारांनी अभ्यास करायला हवा, अन्यथा ही आग आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. दमन, दडपशाहीविरोधात पत्रकारांनी उभे राहायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक महावीर जोंधळे यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले.

पत्रकार दिन सोहळ्यात मुंबई पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पत्रकारांना महनीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी निवडणूक अंदाज स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाने घेतलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला आणि महावीर जोंधळे यांच्या हस्ते या छायाचित्रांच्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
या वेळी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे खजिनदार जगदिश भुवड, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, देवदास मटाले,
कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर, अंशुमन पोयरेकर, देवेंद्र भोगले, किरीट गोरे तसेच अंतर्गत हिशेब तपासनीस हेमंत सामंत आदी उपस्थित होते.
देशभरातील परिस्थितीमुळे आज सर्वसामान्य माणूस भयाकूल आहे. भय कोणत्या मार्गाने आपल्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही. त्यावर मात करण्यासाठी मानवता वाढवणे, जपणे गरजेचे
आहे; अन्यथा आपला इस्त्राईल होईल, अशी भीतीही जोंधळे यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी त्यांच्या हस्ते मंगेश मोरे (आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार), घनश्याम भडेकर (जयहिंद प्रकाशन पुरस्कार), सचिन लुंगसे (कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार), विनोद राऊत (विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार) आणि पांडुरंग म्हस्के (नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
निवडणूक अंदाज स्पर्धेतील विजेते नंदू धुरंधर, संजीव उपरे, छायाचित्र स्पर्धेचे संयोजक अंशुमन पोयरेकर यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments