प्रतिनिधी – हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियम लीग २०२४ KTPL – 3 या क्रिकेट स्पर्धा शनिवार रविवार १३ व १४ एप्रिल २०२४ ला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत आठ संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धा दोन दिवस चालल्या मैदानात कडक उन्हात सुद्धा क्रिकेटप्रेमीने भरले होते. सर्वच सामने अटीतटीची झाले मात्र गुलाल सावकार संघाने उधळला विजेता संघ मालक नितीन शेवाळे यांच्या संघाने समानचिन्ह,रोख पारितोषिक ७७ हजार रुपये जिंकले तर संघ मालक अमित शेटे यांच्या मुक्ताई इलेव्हन संघ,येळगाव या उपविजेता संघाने सन्मानचिन्ह व रोख ५५ हजाराचे बक्षीस जिंकले.तर इतर तृतीय,चतुर्थ पारितोषिक सह सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यावर बक्षिसाची लयलूट करण्यात आली. सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण ठाणे साज खासदार व आघाडीचे यावेळची उमेदवार राजन विचारे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,नाना पैलवान ,सुरेश कचरे,आचरे मामी, इत्यादि मान्यवर उपस्थित होतेसदर स्पर्धा कराड तालुका क्रिकेट असोशियन यांनी आयोजित केली होती या स्पर्धेत एकूण आठ संघमालक सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी संघटनेचे आधारस्तंभ युवा उद्योजक दीपक दादा लोखंडे यांनी ही क्रिकेट स्पर्धेचे उत्तम भव्य दिव्य असे नियोजन केले होते.
