Thursday, July 31, 2025
घरमहाराष्ट्रमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून बातमीच्या फ्रेम चे कौतुक

मंत्री शंभूराज देसाई यांचेकडून बातमीच्या फ्रेम चे कौतुक

तळमावले/वार्ताहर : ना.शंभूराज देसाई यांनी पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री पद स्वीकारल्यानंतर तळमावले विभागात मतदारांचे आभार मानण्यासाठी प्रथमच आले होते. गुढे (ता.पाटण) येथील मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ढेबेवाडी, काळगांव, तळमावले, कुंभारगांव विभागातील ग्रामपंचायती, विविध संस्था आणि मतदार बंधू भगिनी यांनी ना.देसाई यांचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले.
या कार्यक्रमात डाकेवाडी (काळगांव ) येथील ग्रामस्थांनी वृत्तमानपत्रामध्ये ना.देसाई यांना दिलेल्या नेमप्लेट च्या बातमीची फ्रेम भेट दिली. याबातमीच्या खाली ना.शंभूराज देसाई यांचे नाव, पद आणि त्यांना विधानसभेमध्ये मिळालेले 34,824 हे मताधिक्य मोठया ठळक अक्षरात लिहले होते. डाकेवाडीचे सुपुत्र शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी या फ्रेमची सुंदर रचना केली होती.
विशेष म्हणजे ना.शंभूराज देसाई यांनी डाकेवाडी (काळगांव) येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट दिली असताना या ग्रामस्थांकडून त्यांना नेमप्लेट भेट देण्यात आली होती. त्यावर लिहले होेेते “शंभूराज शिवाजीराव देसाई – मंत्री महाराष्ट्र राज्य सन 2024 ते 2029”. ना.देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ही नेमप्लेट चर्चेचा विषय ठरली. या बातमीची फ्रेम ना.देसाई यांना देण्यात आली.
सदर फ्रेम भेट देवुन ना.शंभूराज देसाई यांचे स्वागत डाॅ.संदीप डाकवे, नामदेव डाकवे, बाळू डाकवे, तानाजी साळुंखे, तुकाराम चव्हाण, लक्ष्मण डाकवे, तुकाराम डाकवे, पंढरीनाथ दुधडे, पंजाब देसाई, विलास गोडांबे, राजेश चव्हाण व डाकेवाडीतील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, शंभूराज देसाई यांनी या फ्रेमचे अवलोकन करत डाकेवाडीकरांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments