प्रतिनिधी – अखिल भारतीय संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर होणार आहेत. त्यासाठी संस्थापक अध्यक्ष मा.पिराजी थोरवडे यांनी प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, कला व साहित्य क्षेत्रातील सारस्वतांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतील.त्या अगोदर आलेल्या प्रस्तावातून अतीम निवडी झालेल्या मान्यवरांना निवड झाल्याचे पत्र देण्यात येईल तसेच पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी इस्लामपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथ असे असेल. सदर प्रस्ताव १ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी ९ ५ ६ १ ८ ५ १ ४ २ २ व ७ ५ ८ ८ ९ ४ ९ ६ ९ २ या क्रमांकावर संपर्क करता येईल.
प्रस्ताव पाठविण्यासाठी कृषी, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता व कला या क्षेत्रात कार्य केल्याबद्दल दोन पाणी माहिती अहवाल व त्याबरोबर फोटो किंवा इतर काही बाबींचा उल्लेख होईल अशी माहिती पाठवावी. सोबत आपला परिचय नाव पत्ता इत्यादी दोन आयडेंटीटी फोटोसह पाठवा. तसेच साहित्यिकांनी कथासंग्रह, कादंबरी, कविता/गजल संग्रह, आत्मचरित्र, चरित्र, इतिहास, कृषी विषयक, संशोधन ग्रंथ अशा २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याच्या दोन प्रती, एक पानी आपले परिचय पत्र व दोन आयडेंटिटी फोटोसह खालील पत्त्यावर दिनांक ३१ जानेवारी २०२५ च्या अगोदर पोहोचतील असे पाठवावेत.
पत्ता – अध्यक्ष,मा.पिराजी थोरवडे,मु.पो.साखराळे (इस्लामपूर) ता. वाळवा जि.सांगली. पिन-४१५४१४.
मो.नं.९५६१८५१४२२.
स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या पुरस्कारासाठी आवाहन
RELATED ARTICLES