Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रधारावीतील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची आढावा...

धारावीतील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची आढावा बैठक

प्रतिनिधी : धारावीचा पुनर्विकास हा गृहनिर्माण विभागाचा सर्वात मोठा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाबाबत बराच गदारोळ झालेला असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाची बैठक घेत अपात्र झोपडपट्टी धारकांना घरे देण्यासाठीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले आहे.उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. मुंबईकरांच्या घरांबाबत या बैठकीत चर्चा झाली.२००७ पूर्वीचे ६० हजारांहून अधिक असे पात्र झोपडपट्टीधारक धारावीमध्ये आहेत. अनधिकृत झोपडपट्टीवासीयांची संख्या सद्यस्थितीत १ लाखाच्या वर पोहोचली आहे. या सर्वांना घरे देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही बैठक घेतली.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लोकांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते सरकार या निवडणुकीत अपयशी ठरल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत सांगितले की. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळात सर्वांना घरे देण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. लोकांपर्यंत धारावीच्या विकासाबाबतच्या सकारात्मक गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. पुनर्विकास प्रकल्पाबाबत विरोधकांनी वारंवार खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.गृहनिर्माण विभाग हा लोकांच्या अगदी जवळचा, मनाचा विषय आहे. स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हाडा, एस.आर.ए. मध्ये घर मिळवण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती सोपी करा. लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी जास्तीत जास्त प्रक्रिया ऑनलाइन करा. यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आणि मला सर्वसामान्यांसाठी ठोस काम करायचे आहे.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यांचे भांडवल केले होते. यावेळी, अदानीला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प देण्याच्या विरोधात तत्कालीन शिंदे सरकारला महाविकास आघाडीने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत धारावीतील जनतेला घरे मिळवून देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments