प्रतिनिधी : शिव मल्हार युवा प्रतिष्ठान कुलुपवाडी बोरिवली पूर्व आयोजित शिव मल्हार प्रिमियर लीग मध्ये परिवार पतसंस्था संघाने विजेतेपद पटकावले. बोरिवली मागाठाणे मधील धनगर समाजाच्या युवकांनी आपल्या समाजातील युवक एकत्र यावे म्हणून क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. बोरिवली मागाठाणे येथील युवकांचे मार्गदर्शक शिवसेना मागाठाणे विधानसभा निरीक्षक व सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक विजेता संघ परिवार पतसंस्था संघाला देण्यात आले व प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुळशीराम धायगुडे आणि सचिव शैलेश झोरे खजिनदार गंगाराम खताळ, उपाध्यक्ष महेश खताळ, दिनेश धायगुडे, सुनील खताळ व अरुण आखाडे, अशोक खताळ, रघुनाथ खरात, चिंदू झोरे उपस्थित होते.*
शिव मल्हार प्रिमियर लीग 2024 मध्ये परिवार पतसंस्था विजेती
RELATED ARTICLES