कराड (प्रतिनिधी ) महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही उभयतांनी ज्या काळामध्ये शूद्राती शूद्र व स्त्रियांना विद्या शिक्षण घेणे हे पाप समजले जायचे ,त्या काळात प्रखर विरोध असताना देखील शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व आपल्याला शिक्षणाचे द्वार खुले केले, अशा या थोर व्यक्तिमत्वास कोटी कोटी प्रणाम असे अभिवादन लायन्स क्लबचे अध्यक्षा ,कोटा अकॅडमीच्या संचालिका मंजिरी खुस्पे यांनी केले ,कोटा अकॅडमीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या ,यावेळी लायन्स क्लबचे सचिव शशिकांत पाटील ,कोटा अकॅडमी चे संस्थापक महेश खुस्पे सर ,व्हॉइस प्रिन्सिपल सना संदे ,सारिका पाटील यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी आठवीच्या विद्यार्थिनी प्रगती व राजनंदिनी यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा पेहराव करून संबंधितांना,संबोधित केले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झाले ,
कोटा अकॅडमीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
RELATED ARTICLES