Thursday, September 4, 2025
घरमहाराष्ट्रसातारा तलाठी संघाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले कौतुक....

सातारा तलाठी संघाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले कौतुक….

सातारा(अजित जगताप ) : राज्याच्या महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी वर्ग म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोहोचलेला शासकीय दुवा आहे सातारा जिल्हा तलाठी संघाचे कामकाज नक्कीच चांगले असेल असे गौरव उद्गार सातारचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले.
सातारा जिल्हाधिकारी पदी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या स्वागतासाठी अनेक मान्यवरांनी भेट दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी पाटील व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वात लक्षवेधी भेट ठरलेले महाराष्ट्र राज्य तलाठी संघ पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पवार, सातारा जिल्हा तलाठी संघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे, उपाध्यक्ष सुहास अभंग, माजी खजिनदार राजेंद्र लेंभे ,वाई तालुका अध्यक्ष अधिक कदम, माण तालुका अध्यक्ष गुलाब उगलमुगले, वाई तालुका कार्याध्यक्ष प्रशांत इंगवले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जाधव व सातारा तालुका तलाठी संघ सरचिटणीस शंभूराजे सपकाळ यांनी आज सातारा जिल्हाधिकारी श्री पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

——————————————-
फोटो सातारा जिल्हा तलाठी संघाच्या वतीने स्वागत स्वीकारताना नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील (छाया- अजित जगताप, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments