प्रतिनिधी : ग्रामस्थ मंडळ वाकी, ग्रामविकास मंडळ मुंबई व नवलाई देवी युवा मंच यांच्या विद्यमाने गेली ३० वर्ष अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित केला जातो. या मंडळाचे ३० वे वर्ष असून मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी रात्र आठ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचे संयोजक मुंबई घाटकोपर चे शिवसेना शाखाप्रमुख संजय कदम आहेत.
कोयना सोळशी कांदाटी विभाग हा सांप्रदायिक वारकरी परंपरेचा असून या १०५ गावांमध्ये गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. अनेकांनी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. असेच प्रयत्न ग्रामस्थ मंडळ वाकी, ग्राम विकास मंडळ मुंबई व नवलाई युवा मंच यासाठी गेले तीन वर्षे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला नवीन वर्षात यश आले असून कोयना विभागात प्रथमच ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होत असल्याने संपूर्ण कोयना विभाग आनंद व्यक्त करत असून कीर्तनाच्या दिवसाची वाट पाहत आहेत.
कोयना सोळशी कांदाटी विभागात प्रथमच ७ जानेवारीला ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार
RELATED ARTICLES