Friday, October 17, 2025
घरमहाराष्ट्रअसुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी "आशेचा " किरण

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी “आशेचा ” किरण

मुंबई(रमेश औताडे) : गेल्या २९ वर्षांमध्ये ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर , दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन त्यांच्या परिवर्तनासाठी “आशेचा ” किरण ठरलेल्या ” संपर्क ” या सामाजिक संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे कौतुक ” नुसी ” चे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले.

संपर्क संस्थेचे लोणावळ्यातील बाल ग्राम पाहून मी भारावून गेले. २९ वर्षापासून (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) SAMPARC ” संपर्क ” हि संस्था संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी काम करते. संपर्क चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत या भेटी दरम्यान दोन तास घालविण्याचा बहुमान मला मिळाला याचा मला आनंद आहे असे कांदळगावकर म्हणाले.

संपर्क मधील पाच मुलींचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही नूसी NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) च्या माध्यमातून मदत करणार आहे.
गोव्यातील प्रतिष्ठित ” नुसी मेरीटाईम अकादमी ” मध्ये जी पी रेटिंग प्रशिक्षणासाठी संपर्क संस्थेच्या पाच तरुणींची निवड केली असल्याचे कांदळगावकर यांनी यावेळी जाहीर केले.

त्यांच्या शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च ” नुसी ” संस्था करणार असून नोकरीची शाश्वती देखील दिली आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे हे चांगले उदाहरण आहे. अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments