खंडाळा(अजित जगताप ) : आजचा दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन आहे. या दिवशी तमाम माता-भगिनींचा गौरव केला जातो. नायगाव ता. खंडाळा नजीक असलेल्या कण्हेरी गावातच धाडसी उद्योजक महिला सौ. दिपाली संदीप भागवत यांच्या गोपालन प्रकल्पाने खऱ्या अर्थाने त्या अनेक गोमाताच्या साई बनलेले आहेत.
त्यांच्या कार्याचा गौरव दुष्काळी खंडाळा ते देशाची राजधानी दिल्ली पर्यंत होत आहे. हा सावित्रीबाईच्या महिला शिक्षणाचा गौरव ठरला आहे. खंडाळा तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील कण्हेरी गावात गाईच्या दुधाची गंगा अवतरण्याची किमया करण्यात आलेली आहे. संपूर्ण जगभर कोरोना काळाने मानवी जीवनावर प्रचंड परिणाम करण्यात आला मुक्या प्राण्यांना तर कुणी वाली राहिले नव्हतं. जनावरांना चारा देणे अवघड होत असतानाच एका शेतकऱ्याची कोरोना काळात अचानक उद्भवलेल्या अग्नीमुळे गंजीतील संपूर्ण चारा नष्ट झाला होता. गोमातेला विकण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली. या मुक्या प्राण्याची जो कोणी निगा राखेल त्यालाच विकण्याचे त्यांचे धडपड पाहून सौ दिपाली भागवत यांनी ती गाय विकत घेतली आणि गोमातेच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाला सुरुवात केली यासाठी त्यांना त्यांचे पती रोटरीयन संदीप भागवत, आई लतिका वडील पांडुरंग यांच्या सोबतच केंद्रीय योजनेचाही हातभार लागला. फक्त कागदावर योजना न राबवता मोठ्या जिद्दीने त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायातील अनुभवानंतर दुग्ध व्यवसायामध्ये पदार्पण केले. एखादी वाक्य माणसाच्या आयुष्याला कलाटणी देते तशा पद्धतीने सातारा जिल्ह्याचे तात्कालीन पोलीस अधीक्षक श्री. के .एम. एम. प्रसन्ना यांनी उद्योजक सौ दिपाली भागवत यांना जिद्द आत्मविश्वास व प्रेरणा दिली .आणि या गोष्टीमुळे त्यांच्यामधील महिला उद्योजक ताठमानाने उभे राहिले आहेत.
आज त्यांनी उभारलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. स्वतः ८० ते ९० गाईंची देखभाल करताना या गाई सुदृढ व सशक्त राहिले पाहिजेत. यासाठी त्यांनी आपल्या गोठ्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा सुरू केलेली आहे.
गावातील २५ एकर शेतजमिनी मधून त्यांनी हत्ती घास, मोर घास व सेंद्रिय खाद्यपदार्थ गाईंना देऊन खऱ्या अर्थाने गोमातेची सेवा व लोकांनी सकस व कोणतेही भेसळ नसलेले दूध देण्याचा उपक्रम राबवला आहे .सध्या त्यांच्या या साईश डेअरी मधून दररोज सहाशे लिटर दूध विक्री केली जाते आहे. साईश डेरी फार्म म्हणजे गुणवत्तेचे दुसरे नाव झालेले आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते. त्याचबरोबर आपली कर्तबदारी दाखवण्यासाठी १८६ वर्षांपूर्वी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले उभे राहिले .त्याच धर्तीवर आधुनिक सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे कार्य शेती पूरक व्यवसायातून दिसून आलेले आहे. उद्योजक संदीप भागवत हे रोटरी क्लबचे पदाधिकारी आहेत तर सौ दिपाली भागवत या इंग्रजी भाषेच्या द्वि पदवीधर आहेत. त्यामुळे इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. परंतु, देशी गाईची निगा राखून त्यांनी खऱ्या अर्थाने देशी वाण जपलेला आहे .
वडिलांच्या देशसवेचे रक्त त्यांच्या अंगात सळसळत आहे. कारण त्यांचे वडील हे देश सेवेमध्ये तीस वर्षे कार्यरत राहून सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत. अशा या उद्योजक महिलांनी शेतकऱ्यांना सक्षम कसे बनावे याचाच गुरु मंत्र दिलेला आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्काराच्या मानकरी आहेत.
स्काय इज लिमिट अशा पद्धतीने त्यांना भविष्यात खूप मोठी मजल मारायची आहे. त्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावर्तन करण्यासाठी एका महिलेने टाकलेले दमदार पाऊल आहे. अशा शब्दांमध्ये दुग्ध व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आहे.
सध्या त्यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये
लहान-मोठ्या ८० ते ९० गाई व चार बैल असून यामध्ये खिलार, गीर, साहिवाल, बालसिंधी, गवळारू, जर्सी व होस्टेन फ्रिजन या गाईसमावेश आहे. गाईंना लागणारे खाद्यही येथेच बनवले जाते. यामध्ये मिनरल मिक्चर, मीठ, खायचा सोडा,गहू, मका यांचा समावेश असतो. दररोज लागणारा ओला चारा,मका व नेपियर गवत स्वतःच्या शेतातून बैलगाडीमधून आणले जाते.
चांगल्या प्रतीच्या चाऱ्याच्या निर्मितीसाठी गोमूत्र व शेण या सेंद्रिय खताचा वापर केला जातो. अशा गाईकडून मिळणारे दूध ऑरगॅनिक म्हणून विकले जाते. दररोज ऑरगॅनिक दूध डेअरीला घातले जाते व सर्व खर्च वजा जाता ३५०० रुपये निव्वळ नफादुधाचे पैसे शिल्लक दररोज राहतात. एका गाईंपासून एक ट्रॉली शेणखत मिळते. आधुनिक पद्धतीने गोपालन केल्यास कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवता येतो.शास्त्रशुद्ध पद्धतीने गोपालन करून गर्भधारणेतील सर्व अडचणी दूर केल्या आहेत. सेक्स सिमन्सचा उपयोग केल्यास नवीन गाई तयार होणारे ब्रीड ५० लिटर दूध देणारी स्वतःच्या गोठ्यात आपल्या हवामानास सामावून घेणारी गाय तयार होते.औषधोपचाराचा खर्च येत नाही. तरी काही गरज पडल्यास गोपालकांना औषध उपचार याविषयी योग्य ती माहिती मिळाल्यास मोठ्या आजाराव्यतिरिक्त डॉक्टर बोलवण्याची आवश्यकताच असते.
—————————————————————————
फोटो – कण्हेरी येथील गोमातेच्या गोठ्यात सेवा करताना सौ दिपाली भागवत (छाया अजित जगताप- खंडाळा)