Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रसन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती...

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर

ठाणे: सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रक शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. या परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, तसेच विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात हे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. (परिपत्रक बातमीसोबत जोडण्यात आले आहे.) हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२२७१५४०२१७४०७ असा आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments