
मुंबई (शांताराम गुडेकर ) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे शाखेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य मिरवणूक,सामाजिक मेळावा,दिनदर्शिका-२०२५ चे प्रकाशन सोहळा विक्रोळी पार्क साईट शिवाजी मैदान,विक्रोळी (प.)मुंबई -७९ येथे बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम,कुणबी मध्यवर्ती संघ सरचिटणीस कृष्णा वणे,कुणबी युवा अध्यक्ष तथा संघ सहसचिव माधव कांबळे यांच्या हस्ते पार पडला.
रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३-३० वा.राम नगर शिवसेना शाखा क्रमांक १२७ येथून मिरवणूक सुरु होऊन ती अमृत नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.महिला लेझीम, खालू बाजा,अनेक वाद्यवृंद संच, आणि विविध महापुरुष, शेतकरी, संत यांच्या भूमिका सादरीकरण करत पुढे बँक ऑफ इंडीया मार्गे सुजाता हॉटेल आशिर्वाद सोसायटी जवळून संदेश विद्यालय ते विद्यादीप शाळेकडून खाली साईबाबा मंदीर असे करून श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे समारोप साठी सायंकाळी ६-३० वा पोहचली.या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष तथा ईशान्य मुंबई उपाध्यक्ष बळीराज सेनाचे सोनू शिवगण, शाखा सचिव तथा सचिव विधानसभा घाटकोपर बळीराज सेना सचिन शिवगण,शाखा खजिनदार उपसचिव विधानसभा घाटकोपर बळीराज सेना चंद्रकांत भोज,शाखा संस्थापक तथा घाटकोपर विधानसभा अध्यक्ष बळीराज सेना आत्माराम बाईत,महिला शाखा अध्यक्षा अश्वीणी बाईत,महिला शाखा सचिव अपर्णा जागडे,प्रमुख पाहुणे म्हणून बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम,कुणबी मध्यवर्ती संघ सरचिटणीस कृष्णा वणे,कुणबी युवा अध्यक्ष तथा संघ सहसचिव माधव कांबळे,वासुदेव साळवी- बळीराज सेना सिंधुदुर्ग प्रमुख, सौ.गोंधळी,शिवसेना (उबाठा)चे संजय भालेराव, शिवसेना (शिंदे )डॉ. सुभोध भावधाणे, काँग्रेसचे राम गोविंद यादव आणि सर्व बळीराज सेना पदाधिकारी महिला पदाधिकारी
सर्व कुणबी समाजोन्नती संघ संलग्न विभागिय शाखा पदाधिकारी, सदस्य, युवक मंडळ पदाधिकारी, सदस्य, विवाह मंडळ पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली.कार्यक्रम सुत्रसंचालन सचिन शिवगण, चंद्रकांत भोज यांनी केले तर प्रस्तावना सत्यवान शिंदे( बळीराज सेना सिंधुदूर्ग उपाध्यक्ष घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष)यांनी केली यावेळी प्रकाश वालम, दिलिप कातकर,चंद्रकांत गोवळकर,अमर डीके, सुरेश मांडवकर, रामानंद कणेरी,दिनेश नावले, मनिष वालम,शंकर मेणे, जनार्दन नाक्ती, अशोक नाक्ती, राजेश बने, अरविंद हरमले, वसंत राऊत,प्रताप काटकर,थोरे, निंबरे,खामकर सर्व कार्यकारीणी पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद,महिला कार्यकर्त्या पदाधिकारी, सदस्य तसेच प्रसिद्धी प्रमुख शांताराम गुडेकर,केतन भोज यांच्यासह कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृ संस्थेचे पदाधिकारी,युवक मंडळ पदाधिकारी, बळीराज सेना पदाधिकारी,कु.स.संघ शाखा विक्रोळी-घाटकोपर पदाधिकारी,सदस्य, सभासद,महिला मंडळ पदाधिकारी,सदस्य आणि सभासद,आजी -माजी पदाधिकारी,सदस्य, वधू – वर सूचक मंडळ पदाधिकारी,हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.दरम्यान उपस्थित सर्व मान्यवर यांचा शाल, पुष्प करंडक, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सर्व कुणबी समाज बांधव,भगिणी,युवावर्ग सर्वांनी आपला बहुमुल्य वेळ समाज्यासाठी देऊन सहकार्य केल्याबद्दल कु.स. संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी – घाटकोपर पदाधिकारी,सदस्य आणि सभासद यांच्यातर्फे सर्वांचे आभार व्यक्त व्यक्त करून स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.