Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रघावरी ग्राम सेवा संघ मुंबई (रजि.) व ग्रामस्थ मंडळ घावरी तर्फे पाचव्या...

घावरी ग्राम सेवा संघ मुंबई (रजि.) व ग्रामस्थ मंडळ घावरी तर्फे पाचव्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा-२०२५ संपन्न

प्रतिनिधी : घावरी ग्राम सेवा संघ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ घावरी यांच्या संयुक्त विद्यमाने “घावरी ग्राम सेवा संघ मुंबई (रजि.)” ही पाचवी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा-२०२५ महाबळेश्वर तालुक्याचे माजी.सभापती  संजूबाबा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोरेगाव मुंबई विभागाचे शिवसेना विभागप्रमुख  स्वप्निल टेंभवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम कोयना भवन, कोयना वसाहत गोरेगाव मुंबई या ठिकाणी संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संपत भाऊ जाधव (व्हा. चेअरमन मधुसागर महाबळेश्वर) ,श्री. रमेश संकपाळ(सर)-सुयश सामाजिक शैक्षणिक संस्था वाशी नवी मुंबई,श्री.भिमराव धुळप संपादक -धगधगती मुंबई, श्री .संजय दगडू जाधव – अध्यक्ष स्वराज्य फाउंडेशन(चिखली),श्री. सुनील नारायण जाधव (गुरुजी सौंदरी ) श्री.रमेश सकपाळ शिवसेना शाखाप्रमुख -५१ गोरेगाव,श्री.नारायण (बुवा )सकपाळ समाजसेवक(विवर )ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज तोरणे दत्तगुरु मित्र मंडळ अध्यक्ष (निपाणी),श्री .संपत कदम (लामज) अध्यक्ष कोयना वसाहत श्री. विजय सावजी सकपाळ उपसरपंच-घावरी, श्री. प्रकाश नवगणे नाट्यदिग्दर्शक मुंबई ,या मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला.सदर दिनदर्शिका संकल्पना निर्माते श्री. तानाजी लक्ष्मण सकपाळ (मा.सचिव) श्री.किसन शांताराम जाधव, श्री.विजय सावजी सकपाळ(उपसरपंच ) श्री.संदीप मारुती सकपाळ श्री. विठ्ठल बबन सकपाळ श्री.अनिल किसन जाधव यांचा माननीय सभापती यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश किसन सकपाळ,कार्याध्यक्ष श्री. सावजी तुकाराम सकपाळ सचिव श्री. संदीप मारुती सकपाळ ,खजिनदार श्री .वसंत मालु सकपाळ माजी अध्यक्ष श्री.महादेव तुकाराम सकपाळ तसेच मंडळाचे सल्लागार श्री. बाळकृष्ण भगवान सकपाळ यांचे सुंदर अशा सूत्रसंचालनात कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. त्यास बहुसंख्य पाहुणे,ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ आणि समाजातील सामाजिक, शैक्षणिक,आणि राजकीय क्षेत्राची त्रिसूत्री जुळून आल्याने एक आगळावेगळा कार्यक्रम नियोजन करण्याची घावरी ग्राम सेवा संघ मुंबई मंडळाला उत्तम प्रतिसाद मिळाला. समाजाची आवड असलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांनी मंडळाचा भरपूर उदो उदो केला कारण समाजव्यवस्था टिकवण्यासाठी जो घावरी ग्रामस्थ मंडळी चा प्रयत्न आणि आदर्श आहे हा वाखाणण्याजोगा आहे आणि त्यातून समाजातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते यांनी शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते शिकायला हवं असं अनेक मान्यवरांनी उपस्थित पंचक्रोशीतील शेकडो लोकांच्या उपस्थितीत बोलुन दाखवला.हा संदेश आणि आदर्श शिकण्यासाठी आपण ग्रामस्थांनी भव्यदिव्य आयोजन करुन समाजातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते यांना सुध्दा शिकवणं द्यायला हवी तरच कुठेतरी समाजव्यवस्था आपल्या माध्यमातून टिकुन राहिल असे गौरवोद्गार माजी सभापती श्री. संजूबाबा गायकवाड यांनी काढले.
उपस्थित प्रमुख पाहुणे मंडळी चे घावरी ग्राम सेवा संघ मुंबई मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments